बारामतीत होणार पाचवे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 04:29 PM2024-01-09T16:29:52+5:302024-01-09T16:47:38+5:30
हे संमेलन दि. २० व २१ जानेवारी रोजी होणार आहे...
पुणे : अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पाचवे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन, बारामती येथे संपन्न होणार आहे. नटराज नाट्य कला मंडळ बारामती आणि महाराष्ट्र साहित्य परिषद बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमलन पार पडणार आहे. अशी माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष, किरण गुजर, यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे संमेलन दि. २० व २१ जानेवारी रोजी होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून सुनेत्रा पवार, सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, म.सा.प. पुणे, राजन लाखे, अध्यक्ष- अमरेंद्र- भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून लेखिका स्वाती राजे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, लेखक आपल्या भेटीला, कथाकथन, बालकवी संमेलन, परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत.