Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; कोरोनामुळे निकाल घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:51 PM2021-11-24T17:51:04+5:302021-11-24T18:01:21+5:30
कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली....
पुणे: राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कोरोनामुळे यंदा शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात घट झाली आहे. मागील वर्षी पाचवीचा निकाल 24.82 टक्के तर आठवीचा निकाल 15.07 टक्के होता. यावर्षी पाचवी आणि आठवीचा निकाल अनुक्रमे 16.99 आणि 11.39 टक्के लागला आहे. यावर्षीचा पाचवीचा शिष्यवृत्ती निकाल मागील वर्षीच्या तुलनेत 7. 83 ने तर आठवीचा निकाल 3.68 ने घटला आहे.
कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलावे लागली होती. अखेर ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 47 हजार 708 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोनामुळे परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती.
निकाल पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://www.mscepuppss.in/
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते, मात्र कोरूना मुळे विद्यार्थी व शिक्षकांचा प्रत्यक्ष संवाद होऊ शकला नाही. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले. त्यामुळे निकालात घट झाली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.