पाचवा लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ४ डिसेंबरपासून ऑनलाइन रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:51+5:302020-12-02T04:06:51+5:30
पुणे : रसिकांना पाचव्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (लिफी) हिंदी चित्रपटांसह प्रादेशिक भाषांमधील अभिजात कलाकृती देखील अनुभवता येणार आहेत. ...
पुणे : रसिकांना पाचव्या लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (लिफी) हिंदी चित्रपटांसह प्रादेशिक भाषांमधील अभिजात कलाकृती देखील अनुभवता येणार आहेत. येत्या ४ ते ६ डिसेंबर आणि ११ ते १३ डिसेंबर या दरम्यान दररोज सायं. ६ वाजता हा महोत्सव ऑनलाइन रंगणार आहे.
हा महोत्सव तीन टप्प्यांत आयोजित करण्यात आला. पहिला टप्पा २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पार पडला. महोत्सवाचे संचालन माधव तोडी आणि संकल्पना व आखणी विवेक वासवानी यांनी केली आहे आणि अनंत महादेवन, संगीतकार जोडी आनंद-मिलिंद, प्रवेश सिप्पी, दिव्य सोलगामा यासारख्या नामवंतांचा विविध सत्रात सहभाग आहे.
महोत्सवात प्रत्येक एक चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित केला जाईल आणि महोत्सव कालावधीत एकूण ९ हिंदी चित्रपट, तसेच वेगवेगळ्या भाषांमधील ४ ते ५ लघुपट दाखविले जातील.
प्रेक्षकांना घरातील आरामदायी वातावरणात बसून चित्रपट विनामूल्य पाहता येतील आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चासत्रांमध्येही सहभागी होता येईल. त्यासाठी प्लेक्सिगो (यूएफओ मूव्हीजचे एक अंग) हे www.onelink.to/Plexigo मोबाईल अप त्यांना वापरता येईल.
लिफीमध्ये उत्कृष्ट चित्रपट निर्माते आणि वितरक एन. एन. सिप्पी यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे आणि त्यांच्या वो कौन थी, गुमनाम, देवता, सरगम, फकिरा, चोर मचाए शोर आणि अन्य काही उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शनही केले जाईल. या व्यतिरिक्त ‘पापा कहते है’ सारखा चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा लाभलेला ‘मुक्ती भवन’ हा चित्रपटही दाखविला जाणार आहे.
...