पुणे जिल्ह्यातील ६ कारखान्यांची धुराडी झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:43 AM2018-04-06T02:43:17+5:302018-04-06T02:43:17+5:30
जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
सोमेश्वरनगर - जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.९५चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊसगाळपात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. मात्र, उसाचे जादा टनेज बसू लागल्याने कारखान्यांनी ऊसगाळपास विलंब होत आहे. त्यातच राज्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.
सर्व कारखाने बंद होण्यासाठी ऊस उत्पादकांना एक ते दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस, कर्मयोगी, नीरा भीमा, दौंड शुगर, व्यंकटेशकृपा आणि अनुराज शुगर या कारखान्यांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. तर, उर्वरित
अकरा कारखान्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्यासाठी सुरू आहेत.
यावर्षी ऊसउत्पादकांचे उसाचे पीक उशिरा तुटल्याने गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे टनेज घटून ऊसउत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. अडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना उजाडला. त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना अजून एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे हंगाम सुरू होताना साखरेला चांगले दर होते. मात्र, आता साखरेचे दर पडल्यामुळे बँकांनी साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
साखर उताºयात ‘सोमेश्वर’ची बाजी
४जिल्ह्यातील सर्वच कारखाने साखर उताºयातअजून साडेअकराच्या आतच घुटमळट आहेत. अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले आहे. मात्र, या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना साखर उतारा मिळत नाही.
सोमेश्वर कारखाना ११.९५ टक्के साखर उतारा मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. कर्मयोगी कारखान्याने १० लाख ११ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८७ क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बारामती अॅग्रो कारखान्याने १० लाख १९ हजार ६२५ मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख ७१ हजार ४०० पोत्यांचे उत्पादन घेत दूसरा क्रमांक पटकाविला
सोमेश्वर कारखाना :
९ लाख ७ हजार ८१५ मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ७७ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत तिसºया क्रमांकावर आहे.
साखर उतारा
सोमेश्वर कारखाना
११.९५
दौंड शुगर
११.९१
माळेगाव कारखाना
११.९०