Pune: पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून महिलेची ६ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: July 26, 2023 05:38 PM2023-07-26T17:38:34+5:302023-07-26T17:38:48+5:30
पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत वारजे परिसरात ...
पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. याबाबत वारजे परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, महिलेला अनोळखी क्रमांकावरून ‘पार्टटाइम नोकरी करण्यास इच्छुक आहात का?’ असा मेसेज आला. महिलेने होकार दिला असता वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम ग्रुपमध्ये त्यांना सामावून घेतले.
त्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार महिलेकडून तब्बल ५ लाख ९० हजार रुपये उकळले. काही कालावधीनंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. पोलिस निरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत.