ओतूर परिसरात सोमवारी ६ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:17+5:302021-05-25T04:12:17+5:30
नव्या चार रुग्णांमुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार १९५ झाली. त्यातील १ हजार ५६९, बरे झाले आहेत. ...
नव्या चार रुग्णांमुळे परिसरातील बाधितांची संख्या २ हजार १९५ झाली. त्यातील १ हजार ५६९, बरे झाले आहेत. १०१ विविध कोविड सेंटर व ३६ जण घरातच उपचार घेत आहेत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव शेखरे यांनी दिली.
सोमवारी ओतूर शहरात ४ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ९५० झाली आहे. त्यातील ८७० बरे झाले आहेत. ४४ जण उपचार घेत आहेत. ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. बल्लाळवाडीत ८४ पैकी ७४ बरे झाले आहेत. ७ जण उपचार घेत आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील बाधितांची संख्या १८७ झाली आहे. १७५ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत. ७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. यादव शेखरे यांनी दिली.