कुख्यात गुंड आप्पा लोंढेच्या खून प्रकरणातील ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा; तर ९ जणांची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:24 PM2022-05-05T16:24:44+5:302022-05-05T16:25:42+5:30
२८ मे २०१५ उरुळी कांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरुळी कांचन शिंदवणे रस्त्यावर पहाटेच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती
लोणी काळभोर : कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील ६ जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटे यांचेसह ९ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी संतोष मिनराव शिंदे (वय ३४ रा. शिंदवणे, ता. हवेली), निलेश खंडू सोलनकर (वय ३०, रा.डाळिंब, दत्तवाडी ता. हवेली) राजेंद्र विजय गायकवाड (वय २४, रा. शिंदवणे, ता. हवेली), आकाश सुनिल महाडीक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) विष्णू यशवंत जाधव ( वय ३७, रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) व नागेश लखन झाडकर (वय २७, रा.पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटे (रा. इमानदारवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) याचेसह नितीन महादेव मोगल (वय २७,) मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा (वय-४५ रा. कॉमर्स झोन, प्रेस कॉलनी रोड, सम्राट मित्र मंडळाजवळ, येरवडा, पुणे, मूळ रा. रामपूर जि. वारंगल, राज्य आंध्रप्रदेश) विकास प्रभाकर यादव (वय ३१ रा. उरुळी कांचन, ता. हवेली), आण्णा उर्फ बबडया किसन गवारी (रा. मेमाणेवाडी, ता. दौंड जि. पुणे) प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन (रा.बायफ रोड उरुळी कांचन, ता. हवेली) सोमनाथ काळूराम कांचन (रा. उरळी कांचन, ता. हवेली),रविंद्र शंकर गायकवाड (रा. कांचन वृंदावन अपार्टमेंट उरुळी कांचन ता. हवेली) व प्रविण मारुती कुंजीर (रा. वळती, ता. हवेली) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२८ मे २०१५ उरुळी कांचन येथील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरुळी कांचन शिंदवणे रस्त्यावर पहाटेच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १५ जणांवर पोलीसांनी आरोपत्र दाखल केले होते. या खटल्याचा आज गुरुवार (५ एप्रिल) रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. यात विष्णू जाधव याच्यासह ६ जणांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ९ जणांना निर्दोष मुक्त केले आहे. या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिरस्थीकर यांनी दिला आहे. कुख्यात गुंड आप्पा लोंढे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गोरख कानकाटे याला सदर गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले असले तरी तो सध्या भाऊ लोंढे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.