Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधितांची वाढ, तर ४ हजार ७१२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 08:52 PM2021-04-18T20:52:52+5:302021-04-18T20:53:55+5:30
दिवसभरात ७३ जणांचा मृत्यू,२० जण पुण्याबाहेरील
पुणे : शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़. आज दिवसभरात २४ हजार ७२ जणांनी कोरोना तपासणी केली असून तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २६.७२ टक्के इतकी आहे.
दरम्यान आज दिवसभरात ७३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६६ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ८७० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार २५० रूग्ण हे गंभीर आहेत़. शहरात आत्तापर्यंत १८ लाख ८० हजार ७३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ६७ हजार २३७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़. तर यापैकी ३ लाख ४ हजार ४९२ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५६ हजार ६३६ इतकी आहे़