कचऱ्यात एका बरणीत अर्भक, ७ ते ८ बरण्यांमध्ये शरीराचे अवशेष; दौंडमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:33 IST2025-03-25T16:32:45+5:302025-03-25T16:33:10+5:30

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून नेमके हे अर्भक कोणत्या रुग्णालयाने फेकून दिले याबाबत तपास सुरु आहे

6 to 7 infants thrown in garbage cans Shocking incident in Daund | कचऱ्यात एका बरणीत अर्भक, ७ ते ८ बरण्यांमध्ये शरीराचे अवशेष; दौंडमधील धक्कादायक प्रकार

कचऱ्यात एका बरणीत अर्भक, ७ ते ८ बरण्यांमध्ये शरीराचे अवशेष; दौंडमधील धक्कादायक प्रकार

दौंड : दौंड परिसरात बोरावके नगरच्या जवळ असलेल्या एका हॉटेलच्या मागे कचराकुंडीवर अर्भक आणि शरीराचे अवशेषच्या बरण्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. 

आज दुपारी एका व्यक्तीला एका हॉटेलच्या मागे एक बॉक्स अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आला. त्यानंतर बॉक्समध्ये काही बरण्या दिसून आल्यानंतर एका बरणीत मृत अवस्थेत असलेले अर्भक दिसले. संबंधित व्यक्तीने तातडीने ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील, युवराज घोडके घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या बॉक्समध्ये एका बाटलीत मृत अवस्थेत असलेले एक अर्भक होते. तर अन्य बरण्यांमध्ये अवयव होते. दरम्यान यावेळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अकरा बरण्याच्या सापडलेल्या बॉक्सच्या उठ्यावर संबंधित रुग्णालयाचा नामोउल्लेख असल्याने संबंधित डॉक्टरांकडेपोलिसांनी चौकशी केली. अकरा बरण्यांवर ऑपरेशन करून अवयव बरणीत ठेवल्यानंतर रुग्णांची नावे आलेली आहे. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप गुजर यांनी संबंधित बरण्या आणि त्यातील अवयवांची तपासणी केली असता पुरुष जातीचे अर्भक असल्याचे चौकशी अंतर्गत माहिती पुढं आली. तसेच संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी बाटल्यांवर असलेल्या रुग्णांच्या नावांच्या कागदपत्रांची फाईल पोलिसांना सादर केलेली आहे. एकंदरीतच अर्भक हे पुरुष जातीचे असल्याने स्त्रीभ्रूणहत्या नसल्याची एकंदरीत माहिती पुढे आली आहे.

बॉक्स उकिरड्यावर गेला कसा

संबंधित रुग्णालयात साफसफाईचे काम सुरू होते. साफसफाई कर्मचाऱ्याने इतर कचरा उचलला आणि टेबलवर असलेला बारा बाटल्यांचा बॉक्स उचलला. आणि हा सर्व कचरा उकिरड्यावर टाकून दिला. आणि त्यानुसार अर्भक सापडल्याची माहिती पुढे आली.

योग्य ती चौकशी सुरू

या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस म्हणाले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. घटनेचा पंचनामा केला त्यानुसार योग्य ती चौकशी सुरू केलेली आहे.

अर्भक पुरुष जातीचे

बरणीत सापडलेले अर्भक हे पुरुष जातीचे असून या संदर्भात पोलीस आणि उपजिल्हा रुग्णालय चौकशी करत आहे. या चौकशी अंतर्गत वस्तुस्थिती पुढे येईल. असे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी दिली.

Web Title: 6 to 7 infants thrown in garbage cans Shocking incident in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.