हायप्रोफाईल कॉल गर्लचं आमिष दाखवून वृद्ध व्यावसायिकास 60 लाखांचा गंडा; कसा घडला प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:09 PM2022-02-12T13:09:23+5:302022-02-12T13:25:37+5:30

हा प्रकार मे २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरु होता

60 lakh fraud old businessman for luring a high profile call girl woman arrrested | हायप्रोफाईल कॉल गर्लचं आमिष दाखवून वृद्ध व्यावसायिकास 60 लाखांचा गंडा; कसा घडला प्रकार?

हायप्रोफाईल कॉल गर्लचं आमिष दाखवून वृद्ध व्यावसायिकास 60 लाखांचा गंडा; कसा घडला प्रकार?

googlenewsNext

पुणे : हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने ७६ वर्षाच्या व्यावसायिकाची ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. दिपाली कैलास शिंदे (वय २६, रा़ नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मे २०२१ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांनी मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब नावाची जाहिरात पाहून संपर्क केला. त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फिर्यादी यांची श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातीला २ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली.

सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिचा शोध घेऊन शिंदे हिला अटक करण्यात आली आहे. शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:चे बँक अकाऊंटचा वापर केला आहे. शिंदे हिच्या मार्फत हा सवे कट कारस्थान करणार्‍या मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी़. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता माळी, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार राहुल हंडाळ, अंकिता राघो, शुभांगी मालुसरे व निलेश लांडगे यांनी ही कारवाई केली. अशा प्रकारे सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

Web Title: 60 lakh fraud old businessman for luring a high profile call girl woman arrrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.