Mhada Lottery: ६० हजार नागरिकांना हवंय म्हाडाचं घर, २४ नोव्हेंबरला होणार ‘ड्रा’

By नितीन चौधरी | Published: November 1, 2023 07:20 PM2023-11-01T19:20:48+5:302023-11-01T19:21:52+5:30

प्रमाणपत्रांच्या पूर्ततेअभावी नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने अर्ज करण्याासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

60 thousand citizens want Mhada house draw will be held on November 24 | Mhada Lottery: ६० हजार नागरिकांना हवंय म्हाडाचं घर, २४ नोव्हेंबरला होणार ‘ड्रा’

Mhada Lottery: ६० हजार नागरिकांना हवंय म्हाडाचं घर, २४ नोव्हेंबरला होणार ‘ड्रा’

पुणे : म्हाडातर्फेपुणे विभागातील सुमारे ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत काढण्यात येणार असून त्यासाठी ५९ हजार ७६६ अर्ज आले आहेत. ही सोडत २४ नोव्हेंबरला काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रांच्या पूर्ततेअभावी नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने अर्ज करण्याासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

या सोडतीत म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमधील गृहनिर्माण योजनेतील ४०३, पंतप्रधान आवास योजनेतील ४३१, १५ टक्के सामाजिक गृह योजनेतील ३४४, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील २ हजार ४४५ व २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २ हजार ४४५ सदनिका अशा एकूण ५ हजार ८६३ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले.

अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाईन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे छाननीमध्ये अर्ज बाद होणार नाही, असा प्रशासनाचा दावा होता. मात्र, प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उशीर झाल्याने नागरिकांचा या सोडतीला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सोडतीसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जांसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत ३१ ऑक्टोबरला संपली असून या मुदतीत म्हाडाकडे ७७ हजार २८० जणांनी अर्ज केले. त्यापैकी ५९ हजार ७६६ अर्जदारांनीच अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरलेलेच म्हाडाच्या सोडतीसाठी पात्र ठरले आहेत.

सोडतीचे वेळापत्रक

अर्जाची प्रारुप यादी : ८ नोव्हेंबर
हरकती नोंदण्याची मुदत : ११ नोव्हेंबर
अंतिम यादी : २० नोव्हेंबर
सोडत : २४ नोव्हेंबर

Web Title: 60 thousand citizens want Mhada house draw will be held on November 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.