अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 08:33 PM2022-07-17T20:33:25+5:302022-07-17T20:33:34+5:30

घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली

61 mobile phones stolen in just six minutes Thieves fled with goods worth nine lakhs | अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

अवघ्या सहा मिनिटांत ६१ मोबाईलची चोरी; नऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

Next

धायरी : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अवघ्या सहा मिनिटांत मोबाईल दुकानात चोरी करून ९ लाख ७९ हजारांचे मोबाईल संच व स्मार्ट वॉच लंपास केले आहेत. ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत दुकानमालक सचिन दत्तात्रय सांगळे (वय :३१, रा. पवळी चौक, धायरी, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन सांगळे यांचे धायरी परिसरातील रायकर नगर येथील गल्ली क्रमांक २२/ ब मध्ये " सांगळे टेलिकॉम मोबाईल हब " या नावाने मोबाईल दुकान आहे. शनिवारी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कटावणीच्या साहाय्याने दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक उचकटून दुकानांमध्ये प्रवेश केला. अवघ्या ६ मिनिटांत एका पोत्यामध्ये दुकानातील विविध कंपन्यांचे मोबाईल एकूण ६१ मोबाईल संच, स्मार्ट वॉच व इतर वस्तू चोरून नेले आहे. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून यामध्ये चोरट्यांनी चोरी करताना पूर्ण तोंड कपड्याने झाकून घेतले असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे. आजूबाजूच्या दुकानामध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे दुचाकीवरून जात आसल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करीत आहेत.

Web Title: 61 mobile phones stolen in just six minutes Thieves fled with goods worth nine lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.