खेड तालुक्यात बुधवारी ६१ रुग्णांची भर; ५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:30+5:302021-08-26T04:14:30+5:30

खेड तालुक्यातील आजतागायत एकूण रुग्णांचा आकडा ३४ हजार २२७ झाला आहे. यापैकी ३३ हजार ४७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली ...

61 more patients in Khed taluka on Wednesday; 5 killed | खेड तालुक्यात बुधवारी ६१ रुग्णांची भर; ५ जणांचा मृत्यू

खेड तालुक्यात बुधवारी ६१ रुग्णांची भर; ५ जणांचा मृत्यू

Next

खेड तालुक्यातील आजतागायत एकूण रुग्णांचा आकडा ३४ हजार २२७ झाला आहे. यापैकी ३३ हजार ४७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत २४४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आजपर्यंत ५०९ एवढा आहे. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात ४६ रुग्ण, चाकण ६, आळंदी १ व राजगुरुनगर ८ असे एकूण ६१ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

यापैकी आंबेठाण १, बहुळ २, भोसे १, चऱ्होली खुर्द २, चास ३, चिंबळी २, चिंचोशी १, गोलेगाव १, गोणवडी १, कडूस २, काळेचीवाडी २, कनेरसर १, खालुम्बरे १, खराबवाडी २, कोये १, कुरुळी १, मरकळ ३, मेदनकरवाडी १, महाळुंगे १, मोहितेवाडी २, मोई २, निघोजे २, पाचर्णेवाडी १, पूर ३, सिद्धेगव्हाण १, तळावडे १, वाडा १, वाफगाव १, येलवाडी २ असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे पाहवयास मिळत आहे. तर रहदारीच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. मात्र गर्दीत अनेक नागरिक विनामास्क वावरत आहेत. तर फिजिकल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला आहे. परिणामी दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रक्षाबंधन दिनी ठिकठिकाणी गर्दीने अगदी कहरच केला होता. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे तथा काळाची गरज आहे.

Web Title: 61 more patients in Khed taluka on Wednesday; 5 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.