‘ताऊते’ चक्रीवादळामुळे पुणे-भूज एक्स्प्रेससह पश्चिम रेल्वेच्या ६१ रेल्वे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:05+5:302021-05-16T04:11:05+5:30
पुणे : ‘ताऊते’ चक्रीवादळामुळे सोमवार दिनांक १७ मे रोजी पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे-भूज एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द ...
पुणे : ‘ताऊते’ चक्रीवादळामुळे सोमवार दिनांक १७ मे रोजी पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे-भूज एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केली आहे. १ताऊते’ १८ मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. सोमवारी ही गाडी रद्द झाल्याने बुधवारी (ता.१९) भुजहुन पुण्याला येणारी एक्स्प्रेसदेखील रद्द करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या ६१ गाड्या रद्द :
पश्चिम रेल्वेने १६ ते २० मेपर्यंत गुजरात राज्यातून सुटणाऱ्या जवळपास ६१ रेल्वे रद्द केल्या आहेत. यात मुंबई, पुण्यासह दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. १७ व १८ मे रोजी प्रवास सुरू करणारी व पुणे स्थानकावरून धावणारी राजकोट सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस, राजकोट-वेरावल एक्स्प्रेस व पोरबंदर-सिकंदराबाद एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.