२६ हजार ५२० रुपयांचा ६१५ लिटर दुधाचा साठा केला नष्ट; एफडीएची पुणे विभागात विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:51 PM2018-01-24T12:51:37+5:302018-01-24T12:53:29+5:30

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या वतीने पुणे विभागात राबविण्यात आलेल्या दुधाच्या विशेष मोहिमेत २६ हजार ५२० रुपयांचा एकूण ६१५ लिटर इतका दुधाचा साठा नष्ट करण्यात आला.

615 liters of milk worth 26 thousand 520 rupees were destroyed; Special campaign by FDA's Pune division | २६ हजार ५२० रुपयांचा ६१५ लिटर दुधाचा साठा केला नष्ट; एफडीएची पुणे विभागात विशेष मोहीम

२६ हजार ५२० रुपयांचा ६१५ लिटर दुधाचा साठा केला नष्ट; एफडीएची पुणे विभागात विशेष मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्दे१६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आली दुधाची विशेष मोहिम अन्न सुरक्षा मानदे कायद्यातील तरतुदीनुसार दंडाची कारवाई : शिवाजी देसाई

पुणे : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या वतीने पुणे विभागात राबविण्यात आलेल्या दुधाच्या विशेष मोहिमेत २६ हजार ५२० रुपयांचा एकूण ६१५ लिटर इतका दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. तसेच २६४ दुधाचे नमुने तपासणीसाठी घेवून विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले.
एफडीएतर्फे पुणे विभागात १६ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत दुधाची विशेष मोहिम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये दुध संकलन केंद्र, दुध वितरक, दुध प्रक्रिया केंद्र (डेअरी) चेक नाका मोहीम, किरकोळ विक्रेते आदी सर्व स्तरावरून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये काही ठिकाणी दुग्धविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा यांची मदत घेण्यात आली. या मोहिमेत ४३ कोरकोळ दुध विक्रेते, १० दुध वितरक, ५४ दुध संकलन व शितकरण केंद्र, ३६ दुध उत्पादक व प्रक्रिया केंद्र तसेच चेक नाक येथून एकूण १५९ अस्थापनामधून विविध ब्रॅण्ड व ब्रॅण्ड विरहित दुधाचे नमुने घेण्यात आले. दुधाच्या नमुन्यांचे अहवाल प्रप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानदे कायद्यातील तरतुदीनुसार दंडाची कारवाई व न्यायालयीन खटले दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: 615 liters of milk worth 26 thousand 520 rupees were destroyed; Special campaign by FDA's Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.