Pune: मराठा आंदोलनामुळे पुण्याहून बीड, लातूरकडे जाणाऱ्या ६२ एसटी गाड्या रद्द
By अजित घस्ते | Published: October 30, 2023 03:05 PM2023-10-30T15:05:30+5:302023-10-30T15:06:22+5:30
गेल्या दोन दिवसांत बीड आणि नांदेडमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे....
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. याला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात बसवर दगडफेक करण्यात आल्याने शिवाजीनगर आगारातून मराठवाड्यातील बीड, लातूरकडे जाणार्या ६२ येणाऱ्या एसटी बसेस सोमवार पासूनरद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही वेळा बसस्थानकावर बसची वाट वाहत थांबावी लागली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक होत आहेत. गेल्या दोन दिवसांत बीड आणि नांदेडमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर एसीटी महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या शिवाजीनगरहून, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस रद्द करण्यात आली आहे. तर लातूर, बीडहून येणाऱ्या एसटी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एसटी उपलब्ध नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तर तर विदर्भ, नागपूरहून पुण्याला येणारी बसदेखील बंद करण्यात आलेली आहे. स्वारगेट आगारातून नियमित ठिकाणी बस सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापुढे वातावरण निवळल्यानंतरच लातूर, बीड या ठिकाणी बस सोडण्यात येणार असल्याचे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागत असल्याने दोन दिवसापांसून एसीटी महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या मराठवाड्याकडून येणा-या बीड, लातूर ,विदर्भ येणा-या गाड्या येत नाही तर शिवाजीनगरहून, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूरकडे जाणाऱ्या अशा ६२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील निर्णय होई पर्यत प्रवाशांनी काळजी घ्यावे असे आवाहन ही करण्यात येत आहे.
- ज्ञानेश्वर रणावरे, शिवाजीनगर आगार प्रमुखदोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरवरून बहिणेकडे आली होती. मात्र मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्या बंद असल्याने परत एसटीने जाण्यासाठी अचडण झाली आहे.
- मनिषा कांबळे, प्रवाशी