न्याय मिळवून देण्याच्या आमिषाने 64 वर्षीय वकिलाकडून महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 10:54 AM2022-02-25T10:54:51+5:302022-02-25T10:57:58+5:30
दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल...
पुणे : कोर्टातील सगळ्या केसेस चालवून न्याय मिळवून देतो असे आमिष दाखवून वकिलाने 38 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 38 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. नंदकुमार डिकोजी पाटील (वय 64, रा. रिमझिम बंगला, विजयनगर कॉलनी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. 2013 पासून आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीचे पटत नसल्यामुळे मागील काही वर्षापासून त्या एकट्या राहतात. तर आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कोर्टातील सगळ्यात केस चालवितो व न्याय मिळवून देतो असे आमिष फिर्यादीला दाखवले.
त्यानंतर फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने, वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादीच्या पाठीमागे कुटुंबीय नसल्याचे पाहून आरोपीने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.