PMC | पुणे महापालिकेच्या साडे सहाशे सेवकांच्या होणार बदल्या!

By राजू हिंगे | Published: April 13, 2023 12:35 PM2023-04-13T12:35:29+5:302023-04-13T12:36:42+5:30

या बदल्यांची तसेच पदस्थापनेची कार्यवाही १७ एप्रिलला केली जाणार आहे...

646 employees of Pune Municipal Corporation will be transferred! | PMC | पुणे महापालिकेच्या साडे सहाशे सेवकांच्या होणार बदल्या!

PMC | पुणे महापालिकेच्या साडे सहाशे सेवकांच्या होणार बदल्या!

googlenewsNext

पुणेमहापालिका प्रशासनाने नुकत्याच १३२ कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्या केल्यानंतर अजून ६४६ सेवकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश आहे. या बदल्यांची तसेच पदस्थापनेची कार्यवाही १७ एप्रिलला केली जाणार आहे. 

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात.

 हे आहेत सेवक

शाखा अभियंता – १८
प्रशासन अधिकारी – ४  
उप अधिक्षक – ४३
उप अधिक्षक – ५६ 
लिपिक टंकलेखक – २७४
वरिष्ठ लिपिक – ११२ 
वरिष्ठ लिपिक – १३९

Web Title: 646 employees of Pune Municipal Corporation will be transferred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.