इंदापूरमध्ये ६४ व्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेला गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:47 AM2018-11-26T00:47:18+5:302018-11-26T00:47:47+5:30
इंदापूर शहरात डॉ. कदम गुरुकुल इंदापूर व सीबीएसई व बीएसजीडब्लूएस भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ६४वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन इंदापूर येथील कदम गुरुकुल येथे करण्यात आले होते.
इंदापूर : शहरात डॉ. कदम गुरुकुल इंदापूर व सीबीएसई व बीएसजीडब्लूएस भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ६४वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा कदम गुरुकुल येथे सुरू आहे. या स्पर्धेचा मुलांचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि सीबीएसई या दोन संघामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सकाळी रंगला होता. मात्र, त्यामध्ये पंचांनी सीबीएसईला ६ बेस, ६ फ्री दिले. त्यानंतर मग महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी मध्येच सामना थांबवून पंचांना बदलण्याची विनंती केली. त्यानंतर मग दोन्ही संघात हमरीतुमरी झाली. यामुळे मध्येच सामना १ ते २ तास थांबला. या वेळी क्रीडा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला. मात्र हा सगळा खटाटोप सीबीएसई संघाला जिंकून आणण्यासाठी होता, असा आरोप पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांनी केला आहे. या वादामुळे मात्र, या स्पर्धेला गालबोट लागले.
इंदापूर शहरात डॉ. कदम गुरुकुल इंदापूर व सीबीएसई व बीएसजीडब्लूएस भारत यांच्या संयुक्त विद्यमाने ६४वी राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन इंदापूर येथील कदम गुरुकुल येथे करण्यात आले होते. तालुका क्रीडा संकुलावर मैदान नसल्याने मुलांच्या स्पर्धा इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या, तर मुलींच्या स्पर्धा डॉ. कदम गुरुकुल मैदानावर घेण्यात आल्या. या स्पर्धा मागील पाच दिवसांपासून सुरू आहेत. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील मुले व मुलींचे जवळपास १६ संघ देशभरातून सहभागी झाले होते.
रविवारी महाराष्ट्र आणि सीबीएसई या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर हा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान पंचांनी सीबीएसई ला ६ बेस, ६ फ्री दिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी मध्येच सामना थांबवून पंचांना बदलण्याची विनंती केली. त्यानंतर मग दोन्ही संघांत वाद निर्माण झाला. यामुळे सामना काही काळ थांबविण्यात आला. दोन्ही संघांतील वाद कमी करण्यासाठी क्रीडा अधिकाºयांनी मध्यस्थी केली. मात्र हा सगळा खटाटोप सीबीएसई संघाला जिंकून आणण्यासाठी होता असा आरोप पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले यांनी केला. एकाच वेळी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे आणि मुलांच्या संघाचे सामने चालू करण्यात आले. कारण दिशाभूल करण्याचा नियोजन कमिटीचा डाव होता. या सर्व प्रकराबद्दल तक्रार महाराष्ट्र बेसबॉल संघाचे व्यवस्थापक अशोक सरोदे यांनी स्कूल गेम फेडरेशनला केली असल्याचेही अनिल चोरमले यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंना वादावादीबाबत विचारणा केली असता, त्यांनी याबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
नियोजनाचा अभाव
तीन दिवसांत मैदानावरील परिस्थिती पाहिली असता, बेसबॉल मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. ४५० खेळाडूंना पिण्यासाठी केवळ दोन वीस लिटरचे जार, निकृष्ट दर्जाचे बेसबॉल मैदान दिसून आले. त्यावरील वाळलेले गवतदेखील काढण्यात आलेले नव्हते. राष्ट्रीय स्पर्धा अशा मैदानावर खेळवल्या जातात का? असा सवाल क्रीडाप्रेमींमधून विचारला जाऊ लागला आहे. राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, मात्र त्याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी बोलावण्यात आला नव्हता. हा सर्व नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून येत होते.
महाराष्ट्रातील त्या सोळा खेळाडूंच्या भवितव्याचे काय?
ही राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या संघातील त्या सोळा खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी या प्रमाणपत्राचा उपयोग झाला असता, मात्र तो संघ अंतिम सामन्यात उपविजेता ठरल्याने त्यांना शासकीय नोकरीत राखीव जागा मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही.