अंथरूणाला खिळून असलेल्यांच्या लसीकरणासाठी ६५ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:51+5:302021-08-19T04:15:51+5:30
पुणे : महापालिकेतर्फे अंथरूणाला खिळलेल्या आणि शारीरिक हालचाल करू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी ९ आॅगस्टपासून विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात ...
पुणे : महापालिकेतर्फे अंथरूणाला खिळलेल्या आणि शारीरिक हालचाल करू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी ९ आॅगस्टपासून विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरूणाला खिळल्याचे कारण, सदरची व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि त्या व्यक्तीच्या जवळचे नातेवाईकांचे संमतीपत्र ही कादगपत्रे आवश्यक आहेत. लसीकरणासाठी महापालिकेला ६५ अर्ज प्राप्त झाले. मात्र, त्यापैैकी ५० अर्जांमधील कागदपत्रे अपूर्ण असल्याने महापालिकेने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आहे.
अंथरूणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी े ुी१्रिििील्ल५ंूू्रल्लं३्रङ्मल्ल.स्र४ल्ली@ॅें्र’.ूङ्मे या ईमेल आयडीवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर पात्र ठरलेल्या व्यक्तींना त्यांना दिलेल्या घरच्या पत्त्यावर तारीख आणि लसीकरणाची वेळ कळवण्यात येणार आहे. दरम्यान, लसीकरण करताना आणि लसीकरणानंतर ३० मिनिटे व्यक्तीचे निरीक्षण करण्यासाठी फॅमिली डॉक्टर उपस्थित असणे अपेक्षित आहे. या मोहिमेअंतर्गत रुग्णांना ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंथरूणाला खिळून असलेल्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घरी जाऊन देण्यात येणार आहे. त्यासाठी नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांची काळजीपूर्वक पुर्तता करुन जमा करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जे अर्ज येतील त्यातून विभागवार नियोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून कमीतकमी वेळेत लसीकरण करता येईल. यासाठी ‘वॅक्सिन आॅन व्हील्स' या वाहनाचा वापर केला जाणार आहे.