६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:39 AM2018-01-04T02:39:50+5:302018-01-04T02:40:21+5:30

राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले.

65 losses on the bus, ST-PMP loss of 15 lakh rupees | ६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान  

६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान  

Next

पुणे - राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले. यात एसटीच्या १५ आणि पीएमपीच्या ताफ्यातील ५० बसचे नुकसान झाले. या नुकसानीचा आकडा १५ लाख २७ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनकर्ते बसस्थानक, रेल्वे स्थानकात जाऊन वाहतुक बंद ठेवण्यास भाग पाडत होते. काही आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करीत बससेच्या काचा फोडल्या. काही आंदोलकांनी बसच्या चाकाची हवा सोडली. शहरासह खेड शिवापूर, बारामती, दौंड, भोसरी, मोशी, देऊळगाव, चाकण, शिक्रापूर येथे एसटीच्या बसवर दगडफेक झाली. चाकण येथील पिंपळगाव जवळ पुणे-औरंगाबाद या वोल्वो गाडीच्या वाहकाच्या बाजुच्या सर्व काचा फोडल्या. चालकाच्या समोरील मोठी काच देखील फोडण्यात आली. या गाडीचे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. एसटीच्या पुणे विभागातील १५ बसगाड्यांचे अंदाजे ६ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पीएमपीकडे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५० बस गाड्यांचे दगडफेकीने नुकसान झाल्याची नोंद झाली. त्यात महामंडळाकडून चालविण्यात येणाºया ४३ आणि ७ खासगी बसचा समावेश आहे. त्यात स्वारगेट आागारातील १० आणि नेहरु आगारातील ११ बस आहेत.

एसटीच्या
335
फेºया रद्द
27
लाखांचे
नुकसान

या बंदमुळे तब्बल
२६ लाख ९५ हजार ३६३ रुपयांचे नुकसान झाले.
त्यात शिवाजीनगर अगारातील सर्वाधिक १७६ फेºया रद्द करण्यात आल्या. त्यामुळे १९ लाख ५० हजार १९१ रुपयांचे नुकसान झाले.

इंदापूर आगारातील ५४ फेºया रद्द झाल्याने ५४ हजार ३०८ आणि दौंडमधील २४ फेºया रद्द झाल्याने ८५ हजार ५३४ रुपयांचे नुकसान झाले. स्वारगेट आणि एमआयडीसीतील प्रत्येकी १५ फेºया रद्द झाल्या. त्यामुळे या आगाराचे अनुक्रमे ३ लाख १९ हजार १४३ आणि ३६ हजार ७२९ रुपयांचे नुकसान झाले.

बंदमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील ३३५ फेºया मंगळवारी रद्द करण्यात आल्या.
 

Web Title: 65 losses on the bus, ST-PMP loss of 15 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.