पुणे मेट्रोला लागणारी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून निर्माण होणार; वर्षाला २ कोटी वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:38 PM2020-09-11T12:38:34+5:302020-09-11T12:40:22+5:30

एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे.

65% of Pune Metro's electricity will be generated from solar energy; saving of 2 crore per year | पुणे मेट्रोला लागणारी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून निर्माण होणार; वर्षाला २ कोटी वाचणार

पुणे मेट्रोला लागणारी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून निर्माण होणार; वर्षाला २ कोटी वाचणार

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षाला २५ हजार टन कार्बनवर प्रतिबंध

पुणे: मेट्रोला लागणाऱ्या एकूण विजेपैकी ६५ टक्के वीज सौर ऊर्जेतून मिळवण्यात येणार आहे. त्यासाठी मेट्रोची सर्व स्थानके, व्यापारी संकूले, डेपो यांच्या छतांवर सौर पँनेल्स बसवण्यात येणार आहेत.
पुण्यात मेट्रोचे वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे ३१ किलोमीटरचे दोन मार्ग आहेत. त्यातील स्वारगेट ते शिवाजीनगर हा ५ किमीचा भूयारी मार्ग वगळता २६ किमीच्या मार्गावर २५ स्थानके आहेत. त्या सर्व स्थानकांच्या छतांवर सौर पँनेल्स असतील. त्याशिवाय वनाज, स्वारगेट व पिंपरी चिंचवड येथील व्यापारी संकूल व मेट्रोच्या अन्य इमारतींवरही अशीच पँनेल्स असतील. 


राज्यात वीज ऊत्पादनाची मक्तेदारी फक्त महावितरणची आहे. त्यामुळे खासगीपणे वीज ऊत्पादीत केली तरी ती महावितरणला द्यावी लागते. मेट्रो मात्र त्यांनी निर्माण केलेली वीज थेट त्यांच्या स्थानक व अन्य आस्थापनांसाठी वापरू शकतील. तसा करार महावितरणबरोबर करण्यात येणार आहे. 
मेट्रोला लागणार्या एकूण विजेपैकी ६५ टक्के वीज यातून मिळेल असा अंदाज आहे. एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे. याशिवाय एरवीच्या विजेसाठी येणारा वार्षिक २ कोटी रूपयांचा मेट्रोचा खर्चही वाचणार आहे. 


नागपूर मेट्रोमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला. तिथे या सौर पँनेल्समधून मोठ्या प्रमाणावर वीज तयार होते आहे. त्याचा वापर मेट्रो स्थानकांमधील विजेसाठी करण्यात येतो. पुण्यातही असाच प्रकल्प करण्यात येणार असून त्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. 
हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो (जनसंपर्क) (२१७)

Web Title: 65% of Pune Metro's electricity will be generated from solar energy; saving of 2 crore per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.