अकरावी सीईटीसाठी ६५ टक्के विद्यार्थी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:56+5:302021-05-11T04:10:56+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला. परंतु, या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमास कोणत्या गुणांच्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला. परंतु, या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमास कोणत्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर राज्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या घटकांकडून ऑनलाइन अभिप्राय घेण्यास सुरुवात करण्यात आली.आत्तापर्यंत २ लाख ७३ हजार ९३५ व्यक्तीने सीईटी बाबत अभिप्राय नोंदविला आहे. तर राज्यातील १९ हजार १५८ शाळांनी दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या सर्वेक्षणाबाबत अभिप्राय दिला आहे.
दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचे सोडून दिले आहे. त्याचप्रमाणे काही विद्यार्थी गावी गेले. त्यांनी आपली पुस्तके सुद्धा विकून टाकली आहेत. त्यामुळे शासनाने सीईटी घेण्याबाबत मागविलेल्या अभिप्राय यावरच पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
--
२९ हजार जणांनी कळविला अभिप्राय
पुणे जिल्ह्यातील २९ हजार ३७६ जणांनी सीईटी घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत आपले मत नोंदविले आहे. तसेच १ हजार २७८ शाळांनी अंतर्गत मूल्यमापन करण्याबाबत ऑनलाइन अभिप्राय दिला आहे.