राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:42 PM2024-02-07T12:42:04+5:302024-02-07T12:42:26+5:30

वसतिगृहाची संख्याराज्यातील वाढावी, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी

6500 to 7000 resident doctors in 23 medical colleges in the state are on strike from today | राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयातील ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आजपासून संपावर

पुणे : गेल्या काही वर्षपासून राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड ) ,वसतिगृहाची संख्याराज्यातील वाढावी, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा याकरिता सातत्याने शासनाकडे मागणी करत आहे. या विषयावर सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , वित्त विभागाचे सहसचिव आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संपावर ठाम असून बुधवारी संध्याकाळ 5 वाजल्यापासून ते संपावर जाणार आहेत. यामध्ये बीजेचे डॉक्टर देखील सहभागी होणार आहेत.  

निवासी डॉक्टरांनी विद्यावेतन वाढवा आणि ते वेळेत द्या, नवे वसतिगृह बांधा, तसेच आहे त्या वसतिगृहाची डागडुजी करा या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत.असे त्यांनी काढलेल्या पत्रकात सांगितले आहे. संपाच्या काळात तातडीची सेवा सुरु राहणार आहे.  

याप्रकरणी पुण्याच्या मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. निखिल गट्टनीनी यांनी सांगितले कि, " आम्ही आमच्या मागण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत आहोत. आम्ही रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोईबाबत दिलगिरी व्यक्त करतो. संपाच्या काळात तात्काळ सेवा सुरु राहणार आहे.  राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालये असून ६५०० ते ७००० निवासी डॉक्टर आहेत. हे सर्वजण संपात सहभागी होणार आहे.

Read in English

Web Title: 6500 to 7000 resident doctors in 23 medical colleges in the state are on strike from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.