लोकअदालतमध्ये ६५ हजार प्रकरणे निकाली

By admin | Published: December 13, 2015 02:54 AM2015-12-13T02:54:42+5:302015-12-13T02:54:42+5:30

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित महालोकअदालतमध्ये घेण्यात आलेल्या एकूण १ लाख १५ हजार ६४६ प्रकरणांपैकी ६४ हजार ८०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

65,000 cases were filed in the public counsel | लोकअदालतमध्ये ६५ हजार प्रकरणे निकाली

लोकअदालतमध्ये ६५ हजार प्रकरणे निकाली

Next

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित महालोकअदालतमध्ये घेण्यात आलेल्या एकूण १ लाख १५ हजार ६४६ प्रकरणांपैकी ६४ हजार ८०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये ४४ हजार ९९० प्रकरणे दाखल पूर्व आहेत. पक्षकारांना एकूण १५ कोटी ४६ लाख ६ हजार ८६३ रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आल्याची माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी दिली.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात शनिवारी महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले दिवाणी, तडजोड योग्य फौजदारी, धनादेश बाऊन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, मोटार वाहन कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, कौटुंबीक, महिलांविषयी, कामगार, औद्योगिक, सहकार, धमार्दाय आयुक्त यांच्याकडील तडजोडयोग्य प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली होती. महालोकअदालतमध्ये दाखलपूर्ण दाव्यांची संख्याही लक्षणीय होती. या महालोकअदालतीसाठी ५४ पॅनेल तयार करण्यात आले होते. सिंबायोसिस विधी महाविद्यालयाचे लिगल एडचे समन्वयक योगेश धरणगुट्टी आणि शिरीष कुलकर्णी यांनी महालोकअदालतच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाल्याचे सांगितले.

Web Title: 65,000 cases were filed in the public counsel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.