रक्तदान शिबिरात ६६ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:05 AM2021-05-03T04:05:57+5:302021-05-03T04:05:57+5:30
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे श्री संत सावतामाळी मंदिररक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे ...
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे श्री संत सावतामाळी मंदिररक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी आरोग्य सभापती प्रवीण माने, सरपंच प्रवीण डोंगरे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक निरीक्षक बिराप्पा लातुरे, डॉ. मिलिंद खाडे, मनोजआण्णा राक्षे, विवेक शिंदे, सुनील सुर्वे यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढविले.
या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या काळात लावलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी तरुण पुढे सरसावल्याने रक्ताचा तुटवडा लवकरच कमी होईल. असा आशावाद यावेळी व्यक्त केला. रक्तदात्यानां तसेच उपस्थित नागरिकांना, कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिविरपेक्षा प्लाझ्मा गुणकारी आहे याचे महत्त्व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी समजून सांगितले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित गायकवाड, नितीन जगदाळे, सचिन भोसले, प्रतीक मिरघणे, सचिन देशमाने, जावेद मुलाणी, आकाश माने, सुरज शेख, धनंजय राऊत, तेजस हेगडे यांनी सहकार्य केले.