६७ गुंड आणि ११ तडीपार अटकेत : ३७ हत्यारे, अमली पदार्थ हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:48+5:302021-03-07T04:11:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सलग पाचव्यांदा ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ शुक्रवारी (दि.५) रात्री राबिवण्यात आले. त्यात एकोणीसशे ...

67 hooligans and 11 deportees arrested: 37 murderers, drugs seized | ६७ गुंड आणि ११ तडीपार अटकेत : ३७ हत्यारे, अमली पदार्थ हस्तगत

६७ गुंड आणि ११ तडीपार अटकेत : ३७ हत्यारे, अमली पदार्थ हस्तगत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात सलग पाचव्यांदा ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ शुक्रवारी (दि.५) रात्री राबिवण्यात आले. त्यात एकोणीसशे गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ६७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कोयते, तलवारी, चॉपर, पालघन, सत्तूर या सारखी ३७ हत्यारे जप्त करण्यात आली. तडीपारीचा भंग करून शहरात आलेल्या ११ तडीपारांना अटक करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने शुक्रवारी शहरात रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

आर्म ॲक्टनुसार ३४ केसेस करून ३६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून २६ काेयते, ५ तलवारी, १ चॉपर, ५ पालघन, १ सत्तूर, १ सुरा अशी ३७ हत्यारे ताब्यात घेण्यात आली. या मोहिमेत २८१ तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ तडीपार शहरातच असल्याचे आढळून आले. त्यांना अटक केली.

संशयीतरित्या फिरणाऱ्या १५ जणांवर कारवाई केली गेली. परिमंडळ १ मधील ६ केसेसमध्ये दोन आरोपींवर अजामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना अटक केली. परिमंडळ ४ मध्ये ७ केसेसमध्ये एका आरोपीवर अजामीनपात्र वाॅरंट बजावून व दोन केसेसमध्ये जामीनपात्र वॉरंट बजावले. या मोहिमेत अमली पदार्थविरोधी पथकाने दोघांना अटक करुन त्यांच्याकडून ३० ग्रॅम ब्राऊन शुगर, ४० मिलीग्रॉम अफीम, १६० ग्रॅम अफीम बोंडे असा २ लाख ३८ हजार ९४० रुपयांचा माल हस्तगत केला. दोघा आरोपींकडून २२ हजार रुपयांच्या बेकायदा सिगारेट जप्त केल्या.

दारू बंदी कायद्यान्वये ५ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ४६ लिटर गावठी दारू जप्त केली गेली. गुन्हेगार तपासणी अभियानात एकूण एकोणिसशे गुन्हेगारांचा माग काढण्यात आला. यात ६४२ गुन्हेगार सापडले. प्रतिबंधक कारवाईच्या ४७१ केसेस करून ४६९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने कोथरूडमधील दंग्याच्या गुन्ह्यातील १० आरोपींना अटक केली. युनिट ४ ने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुटखा व कार असा १६ लाख रुपयांचा माल जप्त केला.

Web Title: 67 hooligans and 11 deportees arrested: 37 murderers, drugs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.