दरमहा मृत्यू ६७० ते ७००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:11 AM2021-01-15T04:11:02+5:302021-01-15T04:11:02+5:30

ससून रुग्णालयात दरमहा ६७० ते ७०० मृत्यू होतात़ तर, ४०० ते ४५० जन्म होतात़ जन्म-मृत्यूची नोंद ससूनमध्ये ...

670 to 700 deaths per month | दरमहा मृत्यू ६७० ते ७००

दरमहा मृत्यू ६७० ते ७००

Next

ससून रुग्णालयात दरमहा ६७० ते ७०० मृत्यू होतात़ तर, ४०० ते ४५० जन्म होतात़ जन्म-मृत्यूची नोंद ससूनमध्ये होणे, त्याची माहिती महापालिकेच्या जन्म व मृत्यू विभागाकडे येणे आणि नंतर ते नागरी सुविधा केंद्राकडे जाणे यात अनेकदा महिनोंमहिने जातात. परिणामी, पुणे जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांना दाखले मिळविण्यासाठी आजही ससून व महापालिकेच्या जन्म व मृत्यू कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात.

कोट १

महापालिकेचा वारंवार पत्रव्यवहार

“ससूनमध्ये होणाऱ्या जन्म व मृत्यूचे दाखले ससून रुग्णालयातच मिळावेत़ याकरिता राज्य शासनाच्या सूचनुनेसार निबंधकांची नियुक्ती करावी व नागरिकांना विनासायास दाखले मिळावेत यासाठी महापालिकेने ‘ससून’शी वारंवार पत्रव्यवहार केला आहे़ परंतु, अद्यापही ‘ससून’कडून याबाबत काहीही कार्यवाही केली गेलेली नाही़ ”

डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका़

कोट २

लसीकरण मोहिमेनंतर नियुक्ती

“कोरोना आपत्ती व आत्ता लसीकरण मोहिमेमुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे़ या कामाचा ताण कमी झाल्यावर ससूनमधील जन्म-मृत्यूचे दाखले ससूनमध्येच मिळावेत, याकरिता राज्य शासनाच्या सूचनेनुसार स्वतंत्र ‘निबंधक जन्म व मृत्यू’ यांची नियुक्ती केली जाईल,” असे ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वास्तविक कोरोनाची साथ २०२० मध्ये येण्यापूर्वी दोन वर्षे शासन आदेश आलेला आहे.

-----------------

Web Title: 670 to 700 deaths per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.