जेजुरीत पहिल्याच दिवशी ६८ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:28+5:302021-01-17T04:11:28+5:30
जेजुरी: कोरोना लसीकरणास शनिवारी सुरुवात झाली असून जेजुरीत पहिल्याच दिवशी ६८ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली. महिला आरोग्य ...
जेजुरी: कोरोना लसीकरणास शनिवारी सुरुवात झाली असून जेजुरीत पहिल्याच दिवशी ६८ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली. महिला आरोग्य कर्मचारी सुनीता खरात यांना पहिली लस देण्यात आली. ज्यांना लस दिली आहे, त्यांना निरीक्षण कक्षात ठेवले आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे जेजुरी ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रबंध भिसे यांनी सांगितले. दरम्यान, लस घेतली म्हणजे झालं असे नाही कोरोनाचा धोका संपलेला नाही त्या संबधातील सर्व नियम यापुढे पाळावेत, असे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालय लसीकरण केंद्र करण्यात आले आहे. शनिवारी लसीकरण उपक्रमाचे उद्घाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे, संदीप जगताप, तालुका आरोग्याधिकारी उज्वला जाधव, सासवडचे अधीक्षक उत्तम तपासे, डॉ.विवेक आबनावे, डॉ दिग्विजय सम्राट, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.प्रमोद वाघ, अनंत देशमुख उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालय लसीकरण केंद्र केले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील २०६ कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील वयोवृद्ध व विविध आजार असणाऱ्या व्यक्ती व त्यानंतर सर्व नागरिकांना ही लस देण्यात येणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
१६ जेजुरी
कोरोनाची पहिली लस सुनीता खरात यांना देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.