पुरंदरमध्ये ६९ कोरोनाबाधित; रुग्णसंख्या कमालाची घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:17+5:302021-05-12T04:12:17+5:30
पुरंदर तालुक्यातील जेजुरी, नीरा, वाल्हे, माळशिरस येथील शासकीय लॅबमध्ये १२९ संशयितांची अँटिजन कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३६ जणांचा ...
पुरंदर तालुक्यातील जेजुरी, नीरा, वाल्हे, माळशिरस येथील शासकीय लॅबमध्ये १२९ संशयितांची अँटिजन कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३६ जणांचा अहवाल बाधित आला, तर जेजुरीच्या ग्रामीण जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ९१ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी करण्यात आली. या पैकी ३३ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. नायगाव येथील ६, जेजुरी ४, भिवडी ३, सासवड, नाझरे, साकुर्डे, तोंडल, वाळुंज येथील प्रत्येकी २, माळशिरस, वाल्हे, वाघापूर, मांडकी, पांगारे, वीर येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मोराळवाडी येथील ३, मुर्टी येथील १ रुग्णाचा कोरोना अहवाल बाधित आला आहे.
जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दि. ११ मे रोजी घेतलेल्या ८९ संशयितांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी घेण्यात आली. पैकी ३३ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधात आले आहेत. जेजुरी ७, मावडी ४, कोळविहिरे, नीरा, वाळुंज प्रत्येकी २, गुळुंचे, नाझरे, यादववाडी, वाल्हे, साकुर्डे, राजेवाडी, भोसलेवाडी, पिसर्वे प्रत्येकी १, तालुक्याबाहेरचे बारामतीच्या जोगवडी ४, मोराळवाडी २, तर हडपसर १ रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.
ग्रामीण कार्यक्षेत्रात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत नीरा, वाल्हे, माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३८ संशयीत रुग्णांची अँटीजेन चाचणी तपासण्यात आली. यापैकी ३ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात १७ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी नीरा, राख येथील प्रत्येकी १ रूग्णांचा कोरोना अहवाल बाधित आला. वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये परिंचे येथील १ रूग्णांचा कोरोना अहवाल बाधित आला. माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी सर्वाचेच अहवाल निगेटिव्ह आले.
---
सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात गेली पाच दिवसांपासून कोरोनाची तपासणी करण्याचे अँटीजेन किट संपले आहेत. गेली पाच दिवसांपासून याठिकाणी आर.टी.- पी.सी.आर. ची चाचणी करावी लागत आहे. या चाचणीच्या अहवाल ससुन रुग्णालयातून ४८ तासांनी येतात. त्यामुळे सोमवारी घेतलेले आर.टी.-पी.सी.आर चाचणीचे मंगळवारी अहवाल आले नाहीत.