एमआयटी पुण्याच्या क्रीडा संमेलनात देशभरातील ६९ शाळा सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 07:12 PM2022-10-04T19:12:48+5:302022-10-04T19:13:08+5:30

एमआयटी विश्वशांती गुरुकुल, आयबी वर्ल्ड स्कूल, पुणे यांनी चौथ्या ISSO (आंतरराष्ट्रीय शाळा क्रीडा संघटना) क्रीडा संमेलनाचे आयोजन केले होते. 

69 schools across the country participated in MIT Pune sports meet | एमआयटी पुण्याच्या क्रीडा संमेलनात देशभरातील ६९ शाळा सहभागी!

एमआयटी पुण्याच्या क्रीडा संमेलनात देशभरातील ६९ शाळा सहभागी!

googlenewsNext

पुणे - 

एमआयटी विश्वशांती गुरुकुल, आयबी वर्ल्ड स्कूल, पुणे यांनी चौथ्या ISSO (आंतरराष्ट्रीय शाळा क्रीडा संघटना) क्रीडा संमेलनाचे आयोजन केले होते.  २७ ते २९ सप्टेंबर २०२२ या तीन दिवसीय क्रीडा संमेलनात तब्बल ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध आंतरराष्ट्रीय मंडळांच्या देशभरातील ६९ शाळांचे हे विद्यार्थी आहेत. विशेषतः तिरंदाजी, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि जलतरण या चार खेळांचं आयोजन संमेलनात करण्यात आले होते. 

फ्लॅग मार्च आणि शपथविधीने या भव्य संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ISSO - इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशनचे संचालक आणि भारतीय शालेय खेळ महासंघाचे कार्यकारी समिती सदस्य जगदीप सिंग उपस्थित होते. ज्यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले आणि मेळाव्याला संबोधित केले. 

तीन दिवसांच्या ISSO स्पोर्ट्स मीटचा सर्वात आव्हानात्मक पैलू म्हणजे सर्व सहभागींनी आपापल्या शाळांना नावलौकिक मिळवून देण्यासाठी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकण्यासाठी प्रयत्न केले.  एम आय टी शाळेने या स्पर्धांमध्ये एकूण ३४ पदके मिळवली. यात १४ सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्य पदकांचा समावेश आहे. करण देब, क्रीडा समन्वयक आणि जितेंद्र यादव, क्रीडा प्रमुख यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रीडा विद्याशाखा एम आय टी तील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.


 
भारतीय स्कूल गेम्स फेडरेशनचे विपणन आणि जनसंपर्क संचालक गौरव दीक्षित आणि ISSO इंडियाचे प्रशासकीय प्रमुख अभिषेक सारस्वत यांनी केलेल्या पारितोषिक वितरणाने संमेलनाची सांगता झाली. 

Web Title: 69 schools across the country participated in MIT Pune sports meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mitएमआयटी