पप्पू वाडेकर खून प्रकरणी ७ जणांवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:51+5:302021-09-15T04:15:51+5:30

११ जुलैला राजगुरूनगर परिसरात वाडेकरचा खून झाला होता. या खून प्रकरणातील टोळी प्रमुख तौसिफ शेख, मिलिंद विठ्ठल जगदाळे, विजय ...

7 killed in Pappu Wadekar murder case | पप्पू वाडेकर खून प्रकरणी ७ जणांवर मोक्का

पप्पू वाडेकर खून प्रकरणी ७ जणांवर मोक्का

googlenewsNext

११ जुलैला राजगुरूनगर परिसरात वाडेकरचा खून झाला होता. या खून प्रकरणातील टोळी प्रमुख तौसिफ शेख, मिलिंद विठ्ठल जगदाळे, विजय ऊर्फ बंटी विठ्ठल जगदाळे, मयूर विठ्ठल जगदाळे (रा. सातकर स्थळ, राजगुरूनगर), जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे (रा. तिन्हेवाडी रोड), प्रवीण ऊर्फ मारुती रमेश थिगळे व पवन सुधीर थोरात (रा. मंचर, ता आंबेगाव) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. खेड, आंबेगाव तालुका व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे या टोळीतील काही जणांवर दाखल आहेत. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून त्याद्वारे आर्थिक फायदा करीत आहेत. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी व यापुढे संघटित गुन्हा किंवा घटनांना आळा बसावा यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 7 killed in Pappu Wadekar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.