चतु:श्रृंगीच्या त्या गुन्ह्यातील घरफोड्यांकडून आणखी ७ गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:14 AM2021-02-09T04:14:02+5:302021-02-09T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चतु:श्रृंगी येथील घरफोडी करणार्यांना पाहून पोलीस पळून गेलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चतु:श्रृंगी येथील घरफोडी करणार्यांना पाहून पोलीस पळून गेलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत गुंडाकडून ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ३ ला यश आले आहे.
सनीसिंग पापासिंग दुधानी (रा. बिराजदारनगर, हडपसर), बिरजूसिंग रजपूतसिंग दुधानी अशी या गुन्हेगारांची नावे आहेत.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात बिरजूसिंग दुधानी याला अटक केली होती. सनीसिंग हा त्यावेळी फरार होता. तो शेवाळवाडी जकातनाका येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व त्यांच्या सहकार्यांनी ३१ जानेवारी रोजी सनीसिंग दुधानी याला पकडले. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी २० गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सनीसिंग व बिरजूसिंग यांनी इतर साथीदारांच्या मदतीने पुण्यातील ४ व पिंपरी चिंचवडमधील ३ असे घरफोडी, जबरी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले. त्यांनी चोरलेल्या सोने चांदींचे दागिने, तिजोरी, रोख रक्कमेपैकी काही दागिने मोडून त्यातून त्यांनी मोटारसायकल खरेदी केली होती. तसेच चोरलेली कार अशा सर्व मिळून १२ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.