औद्योगिक बिलात 7 टक्के बचत शक्य

By admin | Published: November 30, 2014 12:37 AM2014-11-30T00:37:08+5:302014-11-30T00:37:08+5:30

वीजबिलाबाबत सर्व प्रकारच्या ग्राहकांमध्ये जागृती करणो गरजेचे आहे.

7% savings in the industrial bills possible | औद्योगिक बिलात 7 टक्के बचत शक्य

औद्योगिक बिलात 7 टक्के बचत शक्य

Next
पुणो :वीजबिलाबाबत सर्व प्रकारच्या ग्राहकांमध्ये जागृती करणो गरजेचे आहे. औद्योगिक ग्राहकांनी बिलाचा तपशील योग्यरीत्या समजावून घेतल्यास, त्यांना वीजबिलात सात टक्के बचत करणो शक्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता नीळकंठ वाडेकर यांनी केले. 
योगेंद्र तलवारे व प्रकाश बेडेकर लिखित ‘विद्युतदेयक वाचणो एक कला’, आर्ट ऑफ रीडिंग इलेक्ट्रिसिटी बिल या पुस्तकांचे प्रकाशन वाडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महापारेषणचे प्रभाकर देवरे, एमएसईबीचे निवृत्त तांत्रिक सदस्य श्यामसुंदर देव, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक अनंत सरदेशमुख, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर या वेळी उपस्थित होते. 
औद्योगिक ग्राहकांनी वीज 
बिल समजून घेतल्यास, त्यांना होणारा दंड ते आटोक्यात ठेवू शकतील, असे मत तलवारे यांनी या वेळी व्यक्त केले. 
वीजबिल नेमके कसे आकारले जाते, याबाबत महामंडळाच्या कर्मचा:यांत जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे वेलणकर यांनी सांगितले. प्रकाश बेडेकर यांनी प्रस्ताविक केले. हिमाली तलवारे यांनी आभार मानले.  (प्रतिनिधी)
 
वीज उपलब्धतेनुसार विविध झोन तयार करण्यात आले आहेत. तसेच, इंधन किमतीनुसार आकारण्यात येणारा अधिभार, रिअॅक्टिव्ह पॉवर संदर्भातील पेनल्टी व इन्सेन्टिव्ह या सर्वाचा तपशील बिलात दिला जातो. औद्योगिक ग्राहकांनी हा तपशील समजावून घेऊन उपाययोजना केल्यास, त्यांना वीजबिलात सात टक्क्यांर्पयत बचत करता येऊ शकते. त्यामुळे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांत बिल आकारणी विषयी जागृती आवश्यक आहे.
- नीळकंठ वाडेकर, 
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ.

 

Web Title: 7% savings in the industrial bills possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.