शेततळ्यात विषारी आैषध टाकल्याने ७ टन माशांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:27+5:302021-08-12T04:14:27+5:30
बाभुळगाव : पळसदेव (ता. इंदापूर) शेलार पट्टा येथील शेतजमीनीवर एक एकर क्षेत्रात मत्स्य तळ्यात विषारी औषध टाकल्याने ...
बाभुळगाव : पळसदेव (ता. इंदापूर) शेलार पट्टा येथील शेतजमीनीवर एक एकर क्षेत्रात मत्स्य तळ्यात विषारी औषध टाकल्याने रूपचंद जातीचे ६ ते ७ टन वजनाचे जिवंत मत्स्यबीज मेल्याने संबंधीत शेतकऱ्याचे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी संजय एकनाथ शेलार (वय ५२, रा. पळसदेव) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी सुरेश विश्वनाथ शेलार (रा. पळसदेव) यांच्यावर संशय व्यक्त केला जात असून तो शेलार यांचा चुलत भाऊ आहे. संजय शेलार आणि एकनाथ शेलार यांच्यात शेतजमिनीच्या कारणावरून वाद आहे. ६ आॅगस्टला सायंकाळी ४ च्या सुमारास सुरेश शेलावर व त्यांचे या व्यवसायातील सहकारी संतोष लक्ष्मण नगरे हे मत्स्यबीज तळ्याची पहाणी करण्यासाठी शेतात गेले. यावेळी सुरेश शेलार हे त्यांना आडवे गेले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. ७ ऑगस्टला सुरेश शेलार याने पुन्हा संतोष नगरे यांच्या घराजवळ जाऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर ९ आॅगस्ट रोजी संतोष शेलार हे शेततळे पाहण्यासाठी गेले असता तळ्यातील सर्व मत्स्यबीज मृृृृतावस्थेत पाण्यावर तरंगताना दिसून आले. ही माहिती त्यांनी पोलीस पाटील यांना फोनवरून दिली. मासे मरण्याचे कारण तपासले असता विषारी औषध पाण्यात टाकल्याने मासे मृृत्युमुखी पडल्याचे समोर आले. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
फोटो : पळसदेव येथे शेत तळ्यात विषारी औषध टाकल्याने सहा ते सात टन मृत झालेले मत्स्यबीज.