लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना ७ वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 05:13 PM2023-03-17T17:13:31+5:302023-03-17T17:13:39+5:30

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आराेपींनी फिर्यादींना माेटारीत बसवले आणि बंदूक व चाकूचा धाक दाखवून लुटले

7 years hard labor for two who robbed on the pretext of giving a lift | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना ७ वर्षे सक्तमजुरी

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना ७ वर्षे सक्तमजुरी

googlenewsNext

पुणे : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ४६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

ललित दीपक खोल्लम (वय २८) आणि मयूर दिलीप राऊत (वय २१, रा. गहुंजे) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत चंदन राजकुमार शर्मा (वय २०, रा. आंबेगाव) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार १३ ऑगस्ट २०१५ च्या रात्री पुणे-बंगरुळू महामार्गावर हा प्रकार घडला होता.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांना आंबेगावला जायचे असल्याचे ते पुणे-बंगरुळू महामार्गावर पी. के. बिर्याणी हॉटेलजवळ थांबले होते. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आराेपींनी फिर्यादींना माेटारीत बसवले. बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोख ५० हजार रुपये आणि दोन मोबाइल हिसकावून घेत चांदणी चौक येथे सोडून निघून गेले. खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक संजय जाधव, पोलिस हवालदार पुणेकर, जाधव आणि पोलिस नाईक गाढवे यांनी कामकाज पाहिले आहे.

Web Title: 7 years hard labor for two who robbed on the pretext of giving a lift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.