ओतर ग्रामपंचायत साठी ७० . ५६ %मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:58+5:302021-01-16T04:15:58+5:30
ओतूर: ओतूर (ता.जुन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते या करिता शुक्रवारी ७०.५६ टक्के मतदान ...
ओतूर:
ओतूर (ता.जुन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत १७ जागांसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते या करिता शुक्रवारी ७०.५६ टक्के मतदान झाले.
एकुण १४ हजार दोनशे पंच्याहत्तर पैकी १० हजार ७३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहीती निवडणुक अधिकारी लक्ष्मण झांजे यांनी दिली.
सकाळी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली.सर्वत्र मतदान केंद्रा बाहेर रांगा लागल्या होत्या.दुपारी थोडी गर्दी कमी होती.मात्र सायंकाळी परत मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली असल्याने काही ठिकाणी उशीरापर्यंत मतदान सुरु होते.
वार्डनिहाय झालेले मतदान -
वार्ड क्र.१ मध्ये -१७१९,वार्ड क्र.२ मध्ये-१३७७ ,वार्ड क्र.३ मध्ये-१६०७ ,वार्ड क्र.४ मध्ये-१६०८,वार्ड क्र.५ मध्ये-२०४९,वार्ड क्र.६ मध्ये-१७१३ असे एकुण १० हजार ७३ मतदारांनी मतदान केले.ओतूरचे एकूण ७०.५६ टक्के मतदान झाले आहे.
* शंभरी पार आजींचे उत्साहात मतदान.
ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः वयाची शंभरी पार केलेल्या १०५ वर्ष वयाच्या भिकुबाई छबुराव रसाळे यांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावला.मतदानासाठी आलेल्या गावातील वयोवृध्द जेष्ठ नागरिक , विकलांग व्यक्ती आणि महिला वर्गाच्या गर्दीने उपस्थितांचे चांगलेच लक्ष वेधले.
१०५ वयाच्या भिकुबाई छबुराव रसाळे .