जिल्ह्यात ७० टक्के रेशनकार्ड आधार लिंक
By admin | Published: May 1, 2016 02:51 AM2016-05-01T02:51:01+5:302016-05-01T02:51:01+5:30
शहर आणि जिल्ह्यात आता सुमारे ७० टक्के रेशनकार्ड आधार लिंक करण्यात आली आहे. यामुळे बनावट रेशनकार्डांना आळा बसला असून, बोगस लाभार्थी समोर आली आहेत. आधार लिंकडे काम
पुणे : शहर आणि जिल्ह्यात आता सुमारे ७० टक्के रेशनकार्ड आधार लिंक करण्यात आली आहे. यामुळे बनावट रेशनकार्डांना आळा बसला असून, बोगस लाभार्थी समोर आली आहेत. आधार लिंकडे काम पूर्ण झाल्यानंतर बोगस लाभार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
बनावट रेशनकाडर्ला आळा बसून पारदर्शकता आणण्यासाठी राज्यभर संगणीकृत बारकोड रेशन काडर्चा शंभर टक्के प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्य सरकारने आधार क्रमांक आणि रेशनकार्ड लिंक करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत रेशन काडर्धारकांना अर्जासोबत बँक खाते क्रमांक, घरातील महिला कुटुंब प्रमुखाचा फोटो आणि मोबाईल क्रमांकाची माहिती, कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक इत्यादी माहिती स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करण्याचे आवाहन केले होते. सुरुवातील या योजनेकडे रेशन दुकानदार व नागरिकांनी पाठ फिरवली होती. परंतु आधर लिंकीच्या कामात कुसर करणा-या दुकानदारावर कारवाई करण्याचे व नागरिकांचे
धान्य बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झपाट्याने आधार लिंक करण्यात आले. (प्रतिनिधी)
डिसेंबरअखेर पर्यंत केवळ ४० टक्के आधार लिंक झाले होते. गेल्या चार महिन्यात यामध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ही मोहिम अशी सुरु राहणार असून, अद्यापही शिल्लक राहिलेल्या लोकांनी आपले रेशनकार्ड त्वरीत लिंक करावे, असे आवाहन ज्योती कदम यांनी केले.