वीस गुंठ्यांत घेतला ७० टन ऊस , बोरी बुद्रुकमध्ये प्रयोग : खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचा नफा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:52 AM2017-08-21T02:52:31+5:302017-08-21T02:52:37+5:30
बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे.
- राजेश कणसे
राजुरी : बोरी बुद्रुक येथील संपत बबन कोरडे या तरुण शेतकºयाने २० गुठ्यांत २६५ या उसाच्या वाणाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यातून चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे.
एका उसाला २० ते २५ टिपरे असतात. परंतु कोरडे यांनी घेतलेल्या एका उसाला साधारण ३०-३५ टिपरे आली आहेत. त्यांची चांगल्या वाढ देखील झाली असून, वजन देखील चांगले भरत आहे. आतापर्यंत विघ्नहर साखर कारखाना क्षेत्रामध्ये ऊस असलेल्या शेतकºयांनी एकरी शंभर टन ऊस काढला आहे. परंतु कोरडे यांनी अवघ्या वीस गुंठ्यांत (अर्धा एकर) सत्तर ते पंच्चाहत्तर टन उसाचे उत्पादन अवघ्या दहा महिन्यातच काढले आहे. कारण उसाच्या एका पिकाला साधारन पंधरा ते सोळा महिने लागत असतात. या पिकातून त्यांना खर्च वजा जाता दीड लाख रूपयांचा नफा मिळणार आहे. कृषीतज्ज्ञ रूपेश डेरे, विघ्नहर साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी गोपिनाथ औटी, संदीप जाधव, महादू जाधव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) संपत बबन कोरडे या तरूणाचे शिक्षण अॅग्री डिप्लोमा झाले आहे. त्यांना नोकरीतून चांगला पगार मिळत असून, केवळ शेतीची आवड असल्याने या नोकरीवर पाणी सोडले वे शेती करू लागले. त्यांनी गावातील चारंगबाबा सेवा ट्रस्टची असलेली जमीन तीन वर्षांसाठी खंडाने घेतली.
यामध्ये कोरडे यांनी २० गुठ्यांत ऊस लावण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सरूवातीला ताग पेरला. नंतर हा ताग तीन महिन्यानंतर मोठा झाल्यावर गाडून टाकला.
चार ट्रॉली शेणखत पांगवले हा ताग गाडल्यानंतर टॅक्टरने साडेचार फुटाची सरी काढली. त्यात दोन फुटाच्या अंतरावर एक डोळा पध्दत २६५ या जातीच्या वानाची उसाची लागवड केली. संपूर्ण २० गुठांच्या क्षेत्राला ठिबक पध्दतीने पाणी दिले. तसेच महिना झाल्यानंतर सरी फोडून उसाच्या बुडकापाशी चांगल्या प्रकारे माती लावली. तसेच त्यांनी यासाठी शेणखत पोटॅश १८४६ ही खते वापरली.
ऊस लागवडीपासून आतापर्यंत जवळपास फक्त ३६ हजार
रुपये खर्च आलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अतिशय कमी दिवसांत म्हणजे फक्त दहा महिण्यातच हा ऊस तुटायला आला आहे.