चासकमान धरणात ७० टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:32+5:302021-07-25T04:10:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : खेड तालुक्यात चार दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे चासकमान धरण ७० टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यात चार दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे चासकमान धरण ७० टक्के भरले. धरणातून शनिवारी (दि. २४) ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून, वीजनिर्मिती प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला आहे. गेल्यावर्षी धरणात आजच्या दिवशी केवळ १६ टक्के पाणीसाठा धरणात होता.
चासकमान धरणांतर्गत दीड टीएमसी क्षमतेच्या कळमोडी धरणातून सध्या २२०० क्युसेकने विसर्ग होत आहे. पश्चिम भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. ३४ मिमी पाऊस पडल्याची नोंद धरणस्थळावर झाली आहे. आतापर्यंत ७१८ मिमी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. चासकमान धरणस्थळावर ६ मिमी तर, आतापर्यंत एकूण ३९३ पावसाची नोंद या परिसरात झाली आहे. भामा आसखेड धरण ७५ टक्के भरले आहे. गतवर्षी याच दिवशी धरण ४५ टक्के भरले होते. धरणस्थळावर ८१ मिमी पाऊस पडला तर एकुण ५९१ मिमी आतापर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली.
खेड तालुक्यात २० जुलैला ९ पर्जन्य मापन केंद्रावरून मिळालेल्या पर्जन्यमान नोंदी पाहता १८९ मिमी. इतका पाऊस २४ तासांत नोंदवण्यात आला. दि. २१ जुलै रोजी ३८२ मिमी., २२ जुलै रोजी १३३ मिमी. तर २३ जुलै रोजी ३६६ मिमी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी ३९० मिमी. एकूण पावसाची नोंद झाली.