चिंचोळ्या गल्ल्यांमुळे टाकावी लागली ७०० फूट पाईपलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:31 AM2018-11-29T00:31:51+5:302018-11-29T00:32:07+5:30

पाटील इस्टेट वसाहतीत अग्नितांडव : अग्निशमन दलाला वेळेत पोहोचता न आल्याने भडकली आग

700 ft. Pipeline was to be done due to tiny road | चिंचोळ्या गल्ल्यांमुळे टाकावी लागली ७०० फूट पाईपलाईन

चिंचोळ्या गल्ल्यांमुळे टाकावी लागली ७०० फूट पाईपलाईन

Next

पुणे : आगीसारखी दुर्घटना घडल्यावर चिंचोळ्या गल्ल्यांमुळे किती हाहाकार उडतो हे पाटील इस्टेट झोपडपट्टीत दिसले. वसाहतीत १ ते १० नंबरच्या गल्ल्या आहेत़ तेथे साधारण १२०० घरे आहेत़ या गल्ल्यांमध्ये जाण्या-येण्यासाठी अगदी चिंचोळ्या गल्ल्या आहेत़ ही आग अगदी गल्ली नंबर ३ मधील शेवटच्या टोकाला नदीकाठच्या बाजूला लागली़ तिच्या पलीकडे नदीची भिंत आहे़ त्यामुळे अग्निशमन दलाला जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर आपल्या गाड्या उभ्या करून तेथून तब्बल ७०० फूट फायरचे पाईप एकमेकाला जोडत आगीच्या ठिकाणी अगोदर न्यावे लागले़ त्यानंतर पाण्याचा मारा सुरू करावा लागला़ आगीने रौद्र रुप धारण केल्यावर पुणे, पिंपरी-चिंचवड, खडकी, देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या गाड्या मागविण्यात आल्या़ पण या गाड्यांना उभे करण्यासही जागा नव्हती़ त्यामुळे नवीन पुलावर गाड्या उभ्या करून त्यातून पाणी खालच्या गाड्यांमध्ये घेण्यात आले व त्यातून पाणीपुरवठा करण्यात आला़ याबरोबरच खासगी टँकरही मागविण्यात आले़ किमान ३५ गाड्या आग विझविण्यासाठी वापरण्यात आल्या़


गोंधळ आणि गर्दी
आग लागताच एकच गोंधळ उडाला़ आपल्या येथे आग लागल्याचे समजताच लोकांनी हातातील कामे टाकून घराकडे धाव घेतली़ आगीची झळ आपल्या घरापर्यंत येण्याची शक्यता वाटून अनेकांनी घरातील हाताला लागेल ते सामान घेऊन बाहेर येण्याची एकच धडपड सुरू केली़ त्यात या गल्ल्या चिंचोळ्या असल्याने आतून सामान घेऊन बाहेर जाणाऱ्यांची तर त्याचवेळी आत जाणाºयांची गल्ल्यांमध्ये गर्दी झाली़
अग्निशमन दलाचे शहरातील विविध केंद्रांवरील शेकडो कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले़ मात्र, मदती करण्यासाठी मध्ये मध्ये येणाºया तरुणांचा मदतीऐवजी त्रासच जास्त झाला़ अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्याची पाईपलाईन टाकत असताना प्रथम आग पसरू नये यासाठी प्रयत्न करतात़ परंतु, आपल्या झोपडीची आग त्यांनी प्रथम विझवावी, यासाठी तरुणांचा प्रयत्न होता़ कर्मचाºयांच्या हातातून पाईप घेऊन पाणी मारण्याचा प्रयत्न केला़ लांबवर पाईप टाकताना गल्लीतून लोंढ्यामुळे अडथळे येत होते.

अशी लागली आग
वसाहतीत अगदी शेवटच्या टोकाला नदीच्या काठाजवळ असलेल्या लहुजी दुबळे यांच्या घराने शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला़ त्यापाठोपाठ शेजारी असलेल्या दादाराव दुबळे यांच्या घरांना आग लागली़ पण, त्यांच्यापर्यंत अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना पोहोचण्यास वेळ लागल्याने आग भडकली़ वाºयाच्या दिशेने आग पसरत गेली़


सिलिंडरच्या स्फोटांमुळे उडाला भडका
काही घरातील सिलिंडरच्या स्फोटाने आगीचा आणखीच भडका उडाला़ एकमेकांना खेटून असलेल्या घरांमध्ये आग पसरत गेली़ आग पसरत असल्याचे दिसल्यावर स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून घरातील सिलिंडर बाहेर काढण्यास सुरुवात केली़ असंख्य तरुण, महिलांनी घरातील सिलिंडर डोक्यावर घेऊन सुरक्षित स्थळी धाव घेतली़


संसारोपयोगी साहित्य जळून खाक
झोपड्यांमधील गृहोपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रिज, पंखा, लोखंडी कपाटे, कपडे जळून खाक झाली़ एकाच ठिकाणी एकावर एक घरे असल्याने नेमक्या घरांची संख्या सांगणे अवघड असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले़ या झोपड्यांमधील अनेक जण घराबाहेर होते़ त्यामुळे आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले़ त्यांच्याकडे अंगावरील कपड्यांशिवाय काहीही राहिले नाही़ काही महिलांचे दागिने, पैसे घरात ठेवले होते़ तेही या आगीत जळून गेले़ एका महिलेने आपले गंठण, मोबाईल आगीत जळाल्याचे सांगितले़ सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणांहून धूर येत होता़

Web Title: 700 ft. Pipeline was to be done due to tiny road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग