पुण्यासाठी शासनाकडून महिनाभरात ७०० टन डाळ

By admin | Published: July 26, 2016 05:11 AM2016-07-26T05:11:35+5:302016-07-26T05:11:35+5:30

शासनाच्या वतीने देण्यात येणारी स्वस्तातील तूरडाळ मिळण्यासाठी पुणेकरांना किमान एक महिना वाट पाहावी लागणार आहे. पुण्यासाठी शासनाकडून किमान ७०० ते ८०० टन डाळ

700 tons of pulses in a month | पुण्यासाठी शासनाकडून महिनाभरात ७०० टन डाळ

पुण्यासाठी शासनाकडून महिनाभरात ७०० टन डाळ

Next

पुणे : शासनाच्या वतीने देण्यात येणारी स्वस्तातील तूरडाळ मिळण्यासाठी पुणेकरांना किमान एक महिना वाट पाहावी लागणार आहे. पुण्यासाठी शासनाकडून किमान ७०० ते ८०० टन डाळ उपलब्ध होणार आहे. पुणे मर्चंट व अन्य काही
संस्थांच्या मदतीने ३० ते ३५ सेंटर सुरू करून या डाळीची विक्रीची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी सांगितली.
शासनाने केवळ पुणे, नागपूर, औंरगाबाद आणि मुंबई या चार शहरांमध्येच स्वस्त तूरडाळीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये येत्या आॅगस्टअखेरपर्यंत तूर डाळ उपलब्ध होईल. राज्य शासनाच्या वतीने स्वतंत्र निविदा काढून या चार जिल्ह्यांमध्ये काही ठराविक गोदामांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये पुणे मर्चन्ट व अन्य काही सहकारी संस्थाच्या मदतीने शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या तूरडाळीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये गेल्या काही
दिवसांत तूरडाळीचा तुटवडा व वाढलेले दर लक्षात घेता प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एक किलो डाळीचे वाटप करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 700 tons of pulses in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.