नितीन गडकरींच्या पुढाकारातून ७ हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:15+5:302021-06-11T04:08:15+5:30

पुणे : पुणे जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या रुग्णांवर योग्य ते उपचार ...

7,000 amphotericin B injections from Nitin Gadkari's initiative | नितीन गडकरींच्या पुढाकारातून ७ हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन

नितीन गडकरींच्या पुढाकारातून ७ हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या रुग्णांवर योग्य ते उपचार विविध ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे सुरू आहेत. पण म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची कमतरता भासत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. वर्धा या कंपनीने ५० हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले. त्यातील ७ हजार इंजेक्शन पुणे विभागासाठी देण्यात येत आहे.

पुणे विभागासाठी कंपनीने गुरुवारी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जेनेरिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले. येत्या आठवड्यात पुणे विभागसाठी आणखी दोन हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

----------------------------

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयात जेनेरिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाच हजार अम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले.

Web Title: 7,000 amphotericin B injections from Nitin Gadkari's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.