ससूनमध्ये राहण्यासाठी दररोज 70,000; ड्रग माफिया ललित पाटीलचा पाहुणचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 06:06 AM2023-10-05T06:06:50+5:302023-10-05T06:07:52+5:30

ससून रुग्णालयात राहून ड्रग रॅकेट चालवणारा ललित पाटील ससूनमध्ये राहण्यासाठी रुग्णालयातील अतिवरिष्ठांना प्रतिदिन ७० हजार रुपये देत असल्याची माहिती ससूनमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

70,000 per day to live in Sassoon; Hospitality of drug mafia Lalit Patil | ससूनमध्ये राहण्यासाठी दररोज 70,000; ड्रग माफिया ललित पाटीलचा पाहुणचार

ससूनमध्ये राहण्यासाठी दररोज 70,000; ड्रग माफिया ललित पाटीलचा पाहुणचार

googlenewsNext

पुणे : ससून रुग्णालयात राहून ड्रग रॅकेट चालवणारा ललित पाटील ससूनमध्ये राहण्यासाठी रुग्णालयातील अतिवरिष्ठांना प्रतिदिन ७० हजार रुपये देत असल्याची माहिती ससूनमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्याचे पेमेंट कॅशमध्ये आणि आठवड्याची रक्कम एकदाच घेतली जात हाेती आणि त्याचे कलेक्शन ससून रुग्णालयातील अतिवरिष्ठांचा ‘खास’ असलेल्या क्लास-फाेरकडून केले जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर हे न्यायालयाच्या तारखेनिमित्त मुंबईला असल्याने संपर्क हाेऊ शकला नाही.

तीन वर्षांपूर्वी अटकेत असलेला ललित पाटील १६ महिन्यांपासून ससूनमध्ये पाहुणचार घेत आहे. ड्रग रॅकेट सापडले अन् ताे सहीसलामत पळालादेखील. ससूनमधील १६ नंबरच्या कैद्यांच्या वाॅर्डमध्ये त्याची खास बडदास्त ठेवली जात हाेती. येथे त्याच्याकडे सव्वादाेन लाखांचे आयफाेन हाेते.

१६ महिने ससूनचा पाहुणा

ललित तीन वर्षांपूर्वी जून २०२० मध्ये अटक झालेला आहे. तेव्हापासून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केलेली आहे. याला ३९ महिने झाले आहेत. त्यांपैकी त्याने जवळपास  १६ महिने ससूनमध्येच मुक्काम झाेडला.

क्लास फाेर’चा कर्मचारी मध्यस्थ?

ससून रुग्णालयात अतिवरिष्ठांचे ‘अर्थ’कारण सांभाळणारा क्लास फाेरचा कर्मचारी यामध्ये मध्यस्थ आहे. हा कर्मचारी ससून रुग्णालयात महागडी फाेर व्हीलर घेऊन येताे. त्याच्या अनेक प्राॅपर्टीज आहेत.

विश्वसनीय सूत्रांनी ‘लाेकमत’ला दिलेल्या माहितीनुसार ललित हा रुग्णालयातूनच मेफेड्राॅन ड्रगची तस्करी करत हाेता. त्यातून तो काेट्यवधींचा व्यवहार करीत हाेता. १६ नंबर वाॅर्डमध्ये उपचारांसाठी राहू देण्यासाठी व सर्व काही बडदास्त ठेवण्यासाठी ताे दिवसाला ७० हजार रुपये रोख माेजत हाेता. सात दिवसांचे पैसे ॲडव्हान्समध्ये घेतले जात हाेते.

Web Title: 70,000 per day to live in Sassoon; Hospitality of drug mafia Lalit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.