पुरंदर तालुक्यात ७३ कोरोनाबाधित; ७ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:20+5:302021-05-19T04:12:20+5:30
सासवड येथील ग्रामीण रुणाग्णलयात ११० संशयितांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी २८ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड ७, ...
सासवड येथील ग्रामीण रुणाग्णलयात ११० संशयितांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी २८ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड ७, हिवरे ३, बोपगाव, रिसे-पिसे, खळद, पारगाव, खामगाव प्रत्येकी २, टेकवडी, राजुरी, हरणी, सुपे, हरगुडे, तोंडल, केतकावळे, एखतपूर प्रत्येकी १ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ७५ संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १९ रुग्णांचे अहवाल बाधित आले. नायगाव ४, जेजुरी २, बेलसर, सुपा, मावडी, पिंपरे, साकुर्डे, गुळुंचे, तक्रारवाडी, नावळी, मांडकी, सासवड येथील प्रत्येकी १ व तालुक्याबाहेरील मुर्टी येथील १ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहे.
ग्रामीण कार्यक्षेत्रात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत परिंचे, नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजन चाचणी करण्यात आली. परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी वीर येथील ४, हरणी, टोणपेवाडी प्रत्येकी १ रुग्णांचे अहवाल बाधित आले.
नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ संशयित रुग्णांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यापैकी नीरा येथील ६, मांडकी येथील २ रुग्णांचे अहवाल बाधित आले.
जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवार (दि. १७) आरटीपीसीआर चाचणीसाठी घेतलेल्या उर्वरित १२ संशयित रुग्णांचे प्रलंबित अहवाल मंगळवार (दि.१८) प्राप्त झाले असून, हरणी येथील एका रुग्णांचा अहवाल बाधित आला आहे.
जेजरी येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवार (दि.१८) ५२ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. यापैकी ११ रुग्णांचे अहवाल बाधित आले.
जेजुरी ६, नीरा २, रिसे-पिसे, तक्रारवाडी १ व तालुक्याबाहेरील सोमेश्वर येथील १ रुग्णांचा अहवाल बाधित आला आहे. सोमवारी दिवसभरात तालुक्यात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वाल्हे, परिंचे प्रत्येकी २, सासवड, जेजुरी, नीरा प्रत्येकी १ अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली.