शहरातील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी ७३ लाखांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 07:42 PM2018-07-31T19:42:15+5:302018-07-31T19:52:53+5:30

शहरात फिरणा-या मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत असतात.

73 lacs for the control on pig in the city | शहरातील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी ७३ लाखांची तरतूद

शहरातील मोकाट डुकरांच्या नियंत्रणासाठी ७३ लाखांची तरतूद

googlenewsNext
ठळक मुद्देएका वर्षांत ५३०८ डुक्करांची कत्तलमयुर पिगारी या खाजगी कंपनीला मोकाट डुक्करांच्या वराह नियंत्रणासाठी मान्यता

पुणे: गेल्या काही वर्षांत शहरात मोकाट डुक्करांचा त्रास प्रचंड वाढला असून, नागरिकांना उपद्रव देणे व मालमत्तेचे नुकसान करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिकेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच शहराच्या हद्दीतील मोकाट डुकराच्या नियंत्रणासाठी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तब्बल ७३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. मयुर पिगारी या खाजगी कंपनीला तीन वर्षांसाठी देण्यास देखील मान्यता देण्यात आली. 
शहरात फिरणा-या मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. याची दखल घेऊन या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिका हद्दीतील मोकाट डुक्करांच्या वराह नियंत्रणाचे काम मागील आर्थिक वर्षात मयुर पिगारी या कंपनीला दिले होते. त्यासाठी ४८ लाख रुपयांची निविदा स्थायी समितीने मंजुर केली होती.  या मान्यतेनुसार दहा किलो वजनावरील डुक्कर ९९३ रुपये प्रतिनग आणि दहा किलोखालच्या डुक्कराला ५०० रुपये प्रतिनग या प्रमाणे देण्यास आणि लिलावासाठी १५० रुपये व १०० रुपये प्रतिनग निश्चित करण्यात आले होते. 
     या कालावधीत या कंपनीने दहा किलोवरील वजनाचे ५१७८ आणि दहा किलोखालील वजनाची १३० अशी ५३०८ वराहांची कत्तलखान्यात विल्हेवाट लावण्यात आली होती. महापालिकेला लिलावापोटी ७ लाख ७५ हजार रुपये रक्कम प्राप्त झाली.
या आर्थिक वर्षात दहा किलोपेक्षा अधिक वजनाच्या डुकरासाठी ९७९ प्रतिनग आणि दहा किलोपेक्षा कमी वजनाच्या डुकरासाठी ५०० रुपये प्रतिनग असा दर प्रशासनाने निश्चित केला होता. या कामाचा कालावधी तीन वर्षांचा ठरविण्यात आला होता.मयुर पिगरी यांनी निविदेत नमूद केल्याप्रमाणे दहा किलोवरील डुकरासाठी ११४८ रुपये प्रतिनग व १० किलोपेक्षा कमी वजनाच्या डुकरासाठी ५०० रुपये प्रतिनग दर ठरविण्यात आला आहे. यामध्ये सेवकवर्ग, वाहन, इंधन, वाहतुक खर्चासह डुकरे उचलणे व त्याची विल्हेवाट लावण्याचे काम समाविष्ट करण्यात आले आहे.

Web Title: 73 lacs for the control on pig in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.