ओतूर परिसरात दोन दिवसांत ७३ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:31+5:302021-05-07T04:12:31+5:30
ओतूर : ओतूर परिसरात २९ एप्रिलपासून सातत्याने नवीन रुग्ण सापडत आहेत. ओतूर परिसरात बुधवारी, ४६ व गुरुवारी २७ नवीन ...
ओतूर : ओतूर परिसरात २९ एप्रिलपासून सातत्याने नवीन रुग्ण सापडत आहेत. ओतूर परिसरात बुधवारी, ४६ व गुरुवारी २७ नवीन रुग्ण सापडल्याने दोन दिवसांत ७३ नवीन रुग्ण सापडल्याने परिसराची परिस्थिती चिंताजनक आहे. दोन दिवसात नवीन रुग्णामुळे बाधितांची संख्या १ हजार ८७१ झाली आहे त्यातील १ हजार ५३० बरे झाले आहेत २०२ कोविड सेंटर व ६७ जण घरीच उपचार घेत आहेत. ७२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली. या दोन दिवसांत डिंगोरे येथे ११ ,धोलवड ७ ,ओतूर २८ खामुंडी ७,नेतवड माळवाडी ६उदापूर ८ डुंबरवाडी १ हिवरे खुर्द १, असे डॉ सारोक्ते म्हणाले़. ओतूर शहरातील परिस्थिती बिकट आहे. तेथील बाधितांची संख्या ८४७ झाली आहे. ७२५ बरे झाले आहेत. ८६ जण उपचार घेत आहेत. २९ जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे, धोलवड, खामुंडी, उदापूर, नेतवड, माळवाडी व ओतूर शहरात नवीन रुग्ण सातत्याने सापडतात, असे डाॅ. सारोक्ते म्हणाले.