‘कुकडी’त ७३.१३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:50 AM2017-08-19T01:50:02+5:302017-08-19T01:50:05+5:30

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी ७३़ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

73.13 percent storage in 'Kukadi' | ‘कुकडी’त ७३.१३ टक्के साठा

‘कुकडी’त ७३.१३ टक्के साठा

googlenewsNext

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील सर्व धरणांमध्ये सरासरी ७३़ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १0 टक्के पाणीसाठा कमी आहे. डिंभा आणि वडज या धरणांमधून ७.३ टीएमसी पाणी आतापर्यंत नदी व कालव्यात सोडण्यात आलेले आहे़, अशी माहिती माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर व शाखाधिकारी प्रकाश मांडे यांनी दिली.
गेल्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली आहे. मात्र आदिवासी पट्ट्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत काही का प्रमाणात वाढ होत आहे. डिंभा, वडज व येडगाव धरण हे भरलेले होते़ परंतु या धरणातील नदी व कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने वडज व येडगाव धरणाची क्षमता कमी झाली आहे़ तीनही धरणांमिळून ७३२४ द़ ल़ घ. फू. पाणीसाठा नदी व कालव्यातून सोडण्यात आले आहे़ डिंभा धरण मात्र पूर्ण क्षमतेने भरलेले आहे़
वडज धरणात १ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़. १ जूनपासून ५३९ मि.मी. पाऊस झाला आहे़ या धरणातून येडगाव धरणात १६0 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे़ मीना नदीत १४६९ दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे. माणिकडोह या धरणात ६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ७९६ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ७ मि.मी. पाऊ स झाला आहे़ पिंपळगाव जोगा धरणात २ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ८२७ मिमी पाऊस झाला असून, २४ तासांत ३ मि़ मी पाऊस झाला आहे़ चिल्हेवाडी धरणात 0.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ६७३ मि़ मी. पाऊस झाला आहे़ तसेच घोड या धरणात ४़ ५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ १ जूनपासून ९७ मिमी पाऊस झाला आहे़ या धरणात वडज धरणातून मीना नदीद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणाचा पाणीसाठा वाढलेला आहे़
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि़ १ जूनपासून ९६९ मि़ मी. पाऊस झाला असून, २४ तासांत ४ मि़ मी पाऊस झाला आहे. या धरणातून येडगाव धरणात ५५0 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे़, तर उजव्या डावा कालव्यात ३00 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे़ दि़ २६ जुलैपासून विसर्ग सुरू असून आतापर्यंत १२९६ द़ ल़ घ. फू. पाणी या धरणातून विसर्ग करण्यात आले आहे़ घोड ब्रँच व मीना कालव्याला ३५0 दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे़ येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि़ १ जूनपासून ६३६ मि़ मी पाऊस झाला असून, २४ तासांत २ मिमी पाऊ स झाला आहे़ या धरणातून कुकडी कालव्यात ३५0५ दलघफूपाणी सोडण्यात आलेले आहे, तर कुकडी नदीत १८७५ दलघफू पाणी सोडण्यात आलेले आहे़

Web Title: 73.13 percent storage in 'Kukadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.