२४ लाख ६१ हजारांच्या मोबदल्यात केले ७४ लाख ८३ हजार वसूल; बारामतीत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 03:08 PM2020-04-11T15:08:54+5:302020-04-11T15:24:39+5:30
२०१५ मध्ये प्रताप जाधव याने वेगवेगळ्या व्यक्तिच्या नावाने चंकेश्वरा यांना २४ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम व्याजाने दिली होती.
बारामती : शहरातील व्यावसायिकाकडून 24 लाख 61 हजारांच्या बदल्यात ७४ लाख ८३ हजारांची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल केल्याची तक्रार बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. रुपये परत केल्यानंतरही त्या व्यावसायिकाचा पुणे येथील प्लॉट नावावर करण्याची मागणी करत खंडणी मागत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे .
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , या प्रकरणी अनिकेत दिपक चंकेश्वरा (वय 35, रा .देसाई ईस्टेट )या कार डेकोर व्यावसायिकाने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे .त्यानुसार प्रताप रमेश जाधव, विक्रम रमेश जाधव, राकेश रामकिसन वाल्मिकी व रुपेश रामकिसन वाल्मिकी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे .
२०१५ मध्ये प्रताप जाधव याने वेगवेगळ्या व्यक्तिच्या नावाने चंकेश्वरा यांना २४ लाख ६१ हजार रुपयांची रक्कम व्याजाने दिली होती. या बदल्यात चंकेश्वरा यांनी व्याजासह ३२ लाख ८३ हजार रुपये प्रताप जाधव याला परत केले. या रकमेव्यतिरिक्त मागील २५ महिन्यांपासून ते एप्रिल २०२० अखेरपर्यंत चक्रवाढ व्याज म्हणून चंकेश्वरा यांनी ४२ लाख रुपये दिले.चंकेश्वरा यांनी ७४ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम परत केली. शिवाय सिक्युरीटीपोटी जळोची हद्दीतील जमिन गट क्रमांक १६० मधील पाच गुंठ्याचा बिगर शेती प्लॉट खदीखत करून दिला.मात्र , व्याजासह पैसे परत केल्यांतर जळोची येथील हा जमिन व्यवहार परत नावावर उलटून देण्याचा ठरलेला व्यवहार प्रताप जाधव याने पूर्ण केला नाही. त्याच्या फॉर्च्युनर गाडीत चौघांजणांनी चंकेश्वरा यास बळजबरीने बसवून शहरातील माळावरची देवी येथे नेले. तेथे फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत तुझा पुण्यातील आंबेगाव बुद्रूक येथील ३ माज्या नावावर कर तरच तुझा जळोचीतील पाच गुंठ्याचा 30लाख रुपयेप्रमाणे दीड कोटींचा , तुझ्याकडून घेतलेले नऊ कोरे धनादेश तुला परत करतो, अशी धमकी आरोपींनी दिली. आंबेगावचा फ्लॅट नावावर केला नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही, तुझ्यावर व कुटुंबावर काहीजणांना पुढे करून खोटी अॅट्रॉसिटी करेन, अशी धमकी दिली.
या व्यवहारापोटी प्रताप, विक्रम, राकेश व रुपेश यांनी फिर्यादीच्या दुकानात येत त्यांना मानसिक त्रास दिला. घरात घुसत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिविगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे .
दरम्यान , या प्रकरणातील आरोपी प्रताप जाधव याच्या विरोधात यापूर्वी देखील मार्च महिन्यात एक गुन्हा दाखल झाला आहे .जाधव याने शहरातील डॉ. बी. बी. निंबाळकर यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली होती. तर डॉ. निंबाळकर यांच्याकडील कर्मचाऱ्याला जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरनी पोलीस ठाण्यात खंडणी ,अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यानंतर आज दाखल झालेला जाधव याच्यावर खंडणी व सावकारीचा दुसरा गुन्हा आहे.