Ganeshotsav 2022: गणेशोत्सवानिमित्त राज्यात मध्य रेल्वेतर्फे ७४ विशेष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 01:13 PM2022-07-03T13:13:05+5:302022-07-03T13:13:13+5:30
पाच मार्गांवर या रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.
पुणे : मध्य रेल्वेतर्फे आगामी गणेश उत्सवानिमित्त ७४ श्रीगणेशोत्सव विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई-सावंतवाडी, नागपूर-मडगाव, पुणे-कुडाळ, पुणे-थिवीम/कुडाळ-पुणे आणि पनवेल-कुडाळ/थिवीम-पनवेल अशा पाच मार्गांवर या रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.
गाड्यांचा तपशील..
१) मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (४४ सेवा)
- ०११३७ ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम), मुंबई येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री सव्वाबारा वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुपारी दोन वाजता पोहोचेल.
- ०११३८ ही रेल्वे सावंतवाडी रोड येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज दुपारी अडीच वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) मुंबई येथे दुसऱ्या दिवशी साडेतीन वाजता पोहोचेल.
२) नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)
- ०११३९ ही रेल्वे नागपूर येथून २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी सव्वातीन वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचेल.
- ०११४० ही रेल्वे मडगाव येथून २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल.
३) पुणे - कुडाळ विशेष (६ सेवा)
- ०११४१ ही रेल्वे पुणे येथून २३ आणि ३० ऑगस्ट रोजी तसेच ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पोहोचेल.
- ०११४२ ही रेल्वे कुडाळ येथून २३ आणि ३० ऑगस्ट रोजी तसेच ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास पोहोचेल.
४) पुणे - थिवीम/कुडाळ - पुणे विशेष (६ सेवा)
- ०११४५ ही रेल्वे पुणे येथून २६ ऑगस्ट, तसेच २ आणि ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि थिवीम येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोहोचेल.
- ०११४६ ही रेल्वे कुडाळ येथून २८ ऑगस्ट, तसेच ४ आणि ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास पोहोचेल.
५) पनवेल - कुडाळ/थिवीम - पनवेल विशेष (६ सेवा)
- ०११४३ ही रेल्वे पनवेल येथून २८ ऑगस्ट, तसेच ४ आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी दुपारी दोन वाजता पोहोचेल.
- ०११४४ ही रेल्वे थिवीम येथून २७ ऑगस्ट, तसेच ३ आणि १० सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास पोहोचेल.